Homeराजकीयदादासाहेब दोलतडे यांची गनिमी काव्याने जोरदार तयारी; भोसे जि.प. गटात राष्ट्रवादीकडून ताकदीनिशी...

दादासाहेब दोलतडे यांची गनिमी काव्याने जोरदार तयारी; भोसे जि.प. गटात राष्ट्रवादीकडून ताकदीनिशी लढणार, अनेक अदृश्यशक्ती करणार मदत

भोसे / विशेष प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटात येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नंदेश्वर येथील श्री बागडेबाबा दूध संस्थेचे चेअरमन दादासाहेब दोलतडे हे निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांची तयारी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इतर इच्छुक व उमेदवार उघडपणे प्रचार, बैठकांमधून जोरदार तयारी करताना दिसत असले तरी दादासाहेब दोलतडे यांची हालचाल तुलनेने कमी दिसत असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार दोलतडे यांनी गनिमी काव्याने आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तयारी सुरू ठेवली असून योग्य वेळ साधून ताकद दाखवण्याची रणनीती आखली असल्याचे समजते. दादासाहेब दोलतडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठे पाठबळ मिळणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांसह मंगळवेढा तालुक्यातील व भोसे जि.प. गटातील अनेक अदृश्यशक्ती करणार मदत
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांच्या माध्यमातून राज्याचे मंत्री ना. दत्तामामा भरणे हे या निवडणुकीकडे विशेष लक्ष ठेवून असल्याचे समजते. तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे देखील या निवडणुकीत सक्रिय भूमिका बजावून दोलतडे यांना महत्त्वपूर्ण मदत करणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय भोसे जिल्हा परिषद गटातील तसेच मंगळवेढा तालुक्यातील अनेक राजकीय व सामाजिक पातळीवरील अदृश्य शक्ती दादासाहेब दोलतडे यांच्या पाठीशी उभ्या राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात या गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दादासाहेब दोलतडे यांचा गनिमी कावा किती प्रभावी ठरेल याकडे लक्ष
सहकार क्षेत्रात दीर्घ अनुभव, दूध संघाच्या माध्यमातून निर्माण केलेला जनसंपर्क आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव पाहता दादासाहेब दोलतडे हे भोसे जिल्हा परिषद गटातील एक मजबूत दावेदार मानले जात आहेत. योग्य वेळ साधून प्रचारात उतरण्याची त्यांची रणनीती यशस्वी ठरते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच भोसे जिल्हा परिषद गटाची निवडणूक रंगतदार व चुरशीची होण्याची चिन्हे असून दादासाहेब दोलतडे यांची गनिमी काव्याने सुरू असलेली तयारी आगामी काळात किती प्रभावी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!