Homeराजकीयदादासाहेब दोलतडे यांचे भोसे जिल्हा परिषद गटातुन निवडणूक लढविण्याचे संकेत? विश्वसनीय माहिती..

दादासाहेब दोलतडे यांचे भोसे जिल्हा परिषद गटातुन निवडणूक लढविण्याचे संकेत? विश्वसनीय माहिती..

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
भोसे जिल्हा परिषद गटातील सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यापासून संपूर्ण मंगळवेढा तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून, या गटातून दिग्गज नेते दादासाहेब दोलतडे निवडणूक लढविण्याच्या हालचाली करत असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे.

संभाव्य उमेदवारीची चर्चा..
सध्या या गटात आमदार समाधान आवताडे गट विरुद्ध महाविकास आघाडी अथवा समविचारी आघाडी अशी हाय व्होल्टेज लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, आतापर्यंत कोणत्याही गटाकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत राजकीय वर्तुळात दादासाहेब दोलतडे यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा रंगत आहे.

दादासाहेब दोलतडे सशक्त, चाणाक्ष व्यक्तीमत्व..
दादासाहेब दोलतडे हे श्री बागडेबाबा दूध संस्थेचे चेअरमन असून, मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील एक सशक्त आणि अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ते दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे आणि पंचायत समितीच्या माजी उपसभापती कै. इंदुबाई दोलतडे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या परिवाराला गावपातळीपासून ते तालुकास्तरापर्यंत सशक्त राजकीय उपस्थिती आहे.

कोणाकडून लढणार हे अंतिम नसले तरी लढणार हे मात्र नक्की..
दादासाहेब दोलतडे स्वतः किंवा त्यांचे कनिष्ठ बंधू आणि नंदेश्वर गावचे माजी सरपंच गेणा दोलतडे यांचाही उमेदवारीसाठी विचार सुरू आहे. दोलतडे बंधू कोणत्या राजकीय गटाकडून निवडणूक लढविणार, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ते या निवडणुकीत सक्रियपणे उतरतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर भोसे जिल्हा परिषद गटात रंगणारी ही निवडणूक केवळ स्थानिकच नव्हे, तर तालुकास्तरीय राजकारणातही नवे समीकरण तयार करणारी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!