किंचित सुधारणा असूनही, शनिवारी संध्याकाळी दिल्लीच्या हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ श्रेणीत नोंदवली गेली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. CPCB च्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय राजधानीतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सकाळी 9 वाजता 358 वरून 6 वाजता 351 पर्यंत सुधारला.
सीपीसीबीच्या ‘समीर’ ॲपवरून मिळालेल्या आकडेवारीनुसार, बवाना आणि न्यू मोतीबाग केंद्रांमधील AQI अनुक्रमे 405 आणि 408 सह ‘गंभीर’ श्रेणीत नोंदवले गेले.
0-50 मधला AQI ‘चांगला’ आहे, 51-100 ‘समाधानकारक’ आहे, 101-200 ‘मध्यम’ आहे, 201-300 ‘खराब’ आहे, 301-400 ‘अत्यंत खराब’ आहे आणि 401-500 ‘गंभीर’ आहे असे मानले जाते.
शनिवारी दिल्लीत कमाल तापमान 32.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा तीन अंश जास्त होते, तर किमान तापमान 18.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा चार अंशांनी जास्त होते.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आर्द्रतेची पातळी ७८ ते ९८ टक्के राहिली.
रविवारी राष्ट्रीय राजधानीत मध्यम धुके राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 आणि 18 अंश सेल्सिअस राहील.
