Homeराजकीयब्रेकिंग न्यूज | मंगळवेढा तालुका राजकारणात मोठा ट्विस्ट : हुलजंती जिल्हा परिषद...

ब्रेकिंग न्यूज | मंगळवेढा तालुका राजकारणात मोठा ट्विस्ट : हुलजंती जिल्हा परिषद गटातून अनिल सावंत यांचे नाव चर्चेत, भगीरथ भालके डाव उलटवणार?

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हुलजंती जिल्हा परिषद गटात मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. नुकतेच गेल्या अनेक दिवसांपासून हुलजंती जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले हनुमंत दुधाळ यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे, त्यांना भाजपकडून हुलजंती जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळण्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर या गटातील उमेदवारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

दरम्यान, भोसे जिल्हा परिषद गटात गेल्या अनेक वर्षांपासून भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत हे निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी विविध माध्यमातून आपली तयारीही दाखवून दिली आहे. मात्र, भोसे जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. अनिल सावंत यांच्यासह बसवराज पाटील, दादासाहेब दोलतडे, रामेश्वर मासाळ, रविकरण कोळेकर अशी अनेक नावे चर्चेत असल्याने भोसे गटातील उमेदवारीचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता एक मोठा पर्याय समोर येत असून, अनिल सावंत यांना हुलजंती जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी कार्यकर्ते आग्रही असल्याची चर्चा आहे. नुकतीच मरवडे तसेच हुलजंती जिल्हा परिषद गटातील अनेक गावांतील प्रमुख नेत्यांनी अनिल सावंत आणि भगीरथ भालके यांची भेट घेऊन हुलजंती गटातून उमेदवारी देण्याची मागणी केल्याचे समजते.

या घडामोडींच्या अनुषंगाने आज भगीरथ भालके आणि अनिल सावंत हे हुलजंती जिल्हा परिषद गटातील प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. या बैठकीतून महाविकास आघाडीची पुढील रणनीती ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, हनुमंत दुधाळ यांना भाजपात प्रवेश देऊन आमदार समाधान आवताडे यांनी भोसे आणि हुलजंती या दोन्ही जिल्हा परिषद गटांतील भाजपच्या उमेदवारीचा प्रश्न एकप्रकारे सोडविला आहे. तर दुसरीकडे, भोसे जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीत सुरू असलेली उमेदवारीची चुरस लक्षात घेता, अनिल सावंत यांना हुलजंती जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देऊन भोसे गटातील अंतर्गत वाद मिटविण्याचा डाव भगीरथ भालके खेळत असल्याची जोरदार चर्चा आहे. एकूणच, हुलजंती आणि भोसे जिल्हा परिषद गटांतील या राजकीय हालचालींमुळे मंगळवेढा तालुक्याचे राजकारण तापले आहे. याकडे मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झुंज एकाकी..बसवराज पाटील यांनी दिलेली एकाकी झुंज भोसे गटासह मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात कायम स्मरणात...

नंदेश्वर / बाबासाहेब सासणे : मंगळवेढा तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भोसे गटातील लढत अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरली. या गटात भारतीय...

प्रदीप खांडेकर यांनी घेतले चिंचली मायाक्का देवीचे दर्शन; भोसे गटातील अनेक नेतेमंडळींची उपस्थिती

नंदेश्वर /प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित सदस्य प्रदीप खांडेकर यांनी चिंचली येथील मायाक्का देवीचे...

नंदेश्वरची सोनाली दोलतडे हिचे एमपीएससीमध्ये उज्ज्वल यश, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

नंदेश्वर / प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत नंदेश्वर गावची भूमिपुत्री सोनाली जगन्नाथ दोलतडे हिने घवघवीत यश संपादन केले आहे....

प्रदीप खांडेकर यांच्या विजयात ‘ नंदेश्वर पॅटर्न ‘ ठरला निर्णायक

नंदेश्वर/ प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधक आणि हायव्होल्टेज ठरलेल्या भोसे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत अखेर भाजपचे उमेदवार प्रदीप खांडेकर यांनी मोठे मताधिक्य मिळवित...

भोसे गटात कोण बाजी मारणार ? दोन्ही गटाकडून विजयाची दावे, जातीय समीकरणे ठरणार निर्णायक,...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधक ठरलेल्या भोसे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या गटात यंदा तिरंगी...

error: Content is protected !!