Homeराजकीयझेडपी, पंचायत समित्यांचा बिगुल! पहिल्यांदा १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांची...

झेडपी, पंचायत समित्यांचा बिगुल! पहिल्यांदा १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांची निवडणूक; २१ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असा असणार

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क
राज्यातील ३२ जिल्हा परिषदांपैकी १२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पैकी १२५ पंचायत समित्यांची निवडणूक २१ दिवसांत संपविली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मिनी मंत्रालयाचा बिगुल जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वाजणार आहे. ८ जानेवारीपूर्वी या निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते, असे राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

बारा जिल्हा परिषदांचीच होणार निवडणूक
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील उमेदवारांचे आरक्षण काढताना २० जिल्हा परिषदांनी व २११ पंचायत समित्यांनी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निवडणूक थांबविली आहे. आता पहिल्यांदा आरक्षण मर्यादेचे पालन केलेल्या १२ जिल्हा परिषदांचीच निवडणूक होणार आहे. त्यात सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदा आहेत.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान होणार
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आता राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची तयारी केली असून, ८ ते १० जानेवारी दरम्यान त्याची घोषणा होईल, असेही सूत्रांनी सांगितले. बाकीच्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका मात्र ३१ जानेवारीनंतरच होतील. तत्पूर्वी, जानेवारी- फेब्रुवारीत मुदत संपणाऱ्या पाच हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक होईल.

असा आहे संभाव्य कार्यक्रम
उमेदवारी अर्ज भरणे : १० ते १७ जानेवारी,अर्जांची छाननी अन्‌ माघार : १८ ते २० जानेवारी,चिन्ह वाटप : २१ जानेवारी,मतदान : ३० जानेवारी,मतमोजणी : ३१ जानेवारी

२१ जानेवारीला ‘सर्वोच्च’ सुनावणी
राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घ्याव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार नगरपरिषदा- नगरपालिकांची निवडणूक पार पडली. आता महापालिकांची निवडणूक सुरू असून महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. पण, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये आरक्षण काढताना ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने २० जिल्हा परिषदांसह २११ पंचायत समित्यांची निवडणूक लांबली आहे. त्यावर २१ जानेवारीला सुनावणी असून, न्यायालयाच्या आदेशानंतरच पुढील कार्यवाही होईल, असेही आयोगातील सूत्रांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!