Homeराजकीयसोलापूर भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्तक्षेपावरून आ.विजयकुमार देशमुख यांची...

सोलापूर भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्तक्षेपावरून आ.विजयकुमार देशमुख यांची उघड नाराजी..

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील ना. जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र पदाधिकाऱ्यांच्या निवडीपासून ते नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांपर्यंत पालकमंत्री गोरे यांचा वाढता हस्तक्षेप सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या अनेक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना रुचलेला दिसत नाही.

पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांना पक्षांतर्गत विरोध
माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्यासह भाजपच्या अनेक लोकप्रतिनिधींमध्ये व व तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये पालकमंत्री यांच्या या हस्तक्षेपाबाबत नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये ज्या नगरपालिकांची जबाबदारी पालकमंत्री गोरे यांच्याकडे होती, त्या सर्व ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला. या निकालांनंतर पालकमंत्री गोरे यांच्या भूमिकेवर पक्षांतर्गत तसेच राजकीय विश्लेषकांकडून टीका होत आहे.

माजी पालकमंत्री,माजी सहकार मंत्र्यांचा विद्यमान पालकमंत्र्यांना उघड विरोध
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील राजकारण तापू लागले आहे. आमदार विजयकुमार देशमुख व माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री गोरे यांच्या हस्तक्षेपाला उघड विरोध दर्शवत थेट इशारा दिला आहे. महापालिका निवडणुकीत जर पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि ते अन्य पक्षातून किंवा अपक्ष म्हणून उभे राहिले, तर त्यांना मदत करावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

वेळेत उपायोजना करा, भाजप कार्यकर्त्यांची मागणी
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात संयमी आणि मितभाषी म्हणून ओळखले जाणारे आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही, अशा चर्चांना जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने वेळेत दखल घेऊन योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी पक्षातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सोलापूर भाजपमधील ही अंतर्गत अस्वस्थता पक्षासाठी कितपत अडचणीची ठरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!