Homeराजकीयलागा तयारीला!!झेडपी-पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

लागा तयारीला!!झेडपी-पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याअनुसार प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची कालावधी 8 ते 14 ऑक्टोबर 2025 असेल.

मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर…
राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी (Voter List) या निवडणुकांसाठी वापरण्यात येईल. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रारुप (ZP And Panchayat Samiti) मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल. या यादीवर हरकती व सूचना दाखल केल्यानंतर अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर (Elections 2025) केली जाईल.

हरकती व सूचनांचा वापर…
मतदार याद्यांमध्ये विधानसभा मतदार यादीप्रमाणेच नाव व पत्ते कायम ठेवले जातात. नवीन नावांचा समावेश, नावे वगळणे किंवा पत्त्यात दुरुस्ती यासारख्या बदलासाठी केवळ हरकती व सूचनांचा वापर केला जाईल. या प्रक्रियेत मुख्यतः लेखनिकांकडून झालेल्या चुका, प्रभागाच्या यादीत नाव नसणे किंवा निर्वाचक गणनेतील त्रुटी दुरुस्त केल्या जातील.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता…
राज्य निवडणूक आयोगाचे हे पाऊल निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि लोकशाहीतर्फे सहभाग सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मतदार यादीतील हरकती व सूचना दाखल करण्यासाठी नागरिकांनी आपला अधिकार वेळेत वापरण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण…
ठाणे -सर्वसाधारण (महिला)
पालघर – अनुसुसूचित जमाती
रायगड- सर्वसाधारण
रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक -सर्वसाधारण
धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबार-अनुसूचित जमाती
जळगांव – सर्वसाधारण
अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
पुणे -सर्वसाधारण
सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली -अनुसूचित जाती
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा -सर्वसाधारण
यवतमाळ सर्वसाधारण
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा- अनुसूचित जाती
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!