Homeक्राईमलग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल मंगळवेढ्यात एकावर गुन्हा दाखल, लिव्ह...

लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल मंगळवेढ्यात एकावर गुन्हा दाखल, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सोबत राहून ठेवले संबंध..

मंगळवेढा (प्रतिनिधी)
एका २३ वर्षीय तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेवून तिच्या इच्छेविरुध्द शारिरीक संबंध ठेवून गर्भवती केल्याप्रकरणी समाधान श्रीपती कसबे याच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, यातील पिडीतेच्या वडिलाचे दुकान असल्यामुळे ती दुकानावर बसत होती. आरोपी हा येवून काही तरी घेण्याचा बहाना करुन दुकानात येत असे. तू मला खूप आवडतेस माझ्या तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत असताना पिडीतेने त्यास साफ नकार दिला होता. तद्नंतर आरोपीने पिडीतेस लग्न करुया असे म्हणाल्यानंतर त्यास पिडीतेने होकार दिला. यावेळी आरोपीने पिडीतेस एक संपर्क साधण्यासाठी छोटा मोबाईलही घेवून दिला. त्यामध्ये सीमकार्ड टाकून दोघांचे एकमेकाशी संभाषण होत असे. एकदा आरोपीने पिडीतेस एका फॉरेस्टमध्ये भेटण्यास बोलावून घेतले.

त्यावेळी आपण लग्न करु असे म्हणून गोड बोलून आरोपीने पिडीतेशी शारीरिक संबंध ठेवले. तद्नंतर अधून मधून सतत फॉरेस्ट मध्ये अनैतिक संबंध ठेवले जात असे. या दरम्यान पिडीतेस मासिक पाळी आली नाही. तिने प्रेग्नंसी चेक केली असता ती गरोदर असल्याचे समजले. यानंतर आरोपीने पिडीतेस आपण पळून जावून लग्न करु असे म्हणाल्यावर दि.६ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता फॉरेस्टकडे ये असे सांगितले. पिडीतेने सर्व आवरुन ९.३० वाजता फॉरेस्टकडे गेली, त्यावेळी आरोपी व त्याचा मित्र तेथे उपस्थित होते.

आरोपीने पिडीतेस मोटर सायकलवर बसवून पुढे मिरज येथे नेले. तेथील भोसे गावात आरोपीने त्याचे ओळखीने शेतातील एक खोली भाड्याने घेतली. त्यामध्ये संसार उपयोगी साहित्य ठेवून पिडीतेसह तो राहू लागला. आरोपी ट्रॅक्टर वर ड्रायव्हर म्हणून काम करु लागला. तेथे आरोपी दररोज पिडीतेशी शारिरीक संबंध ठेवत असे, पिडीतेने वारंवार लग्न कधी करायचे? असे विचारल्यावर नंतर करु असे तो म्हणत असे. वारंवार लग्नाचे अमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लातूरकर हे करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नंदेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्रलंबित प्रश्नांचे काय???

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!