Homeक्राईममुख्याध्यापकाला शिक्षकाची मारहाण; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, रजेच्या रोखीकरणावरून वाद

मुख्याध्यापकाला शिक्षकाची मारहाण; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, रजेच्या रोखीकरणावरून वाद

(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रजेचे रोखीकरण का थांबवले, या कारणावरून एका शिक्षकाने थेट मुख्याध्यापकाच्या घरी जाऊन मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, रमेश विष्णू पोतदार (वय ५३, रा. धर्मगाव रोड, तावशी) हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तावशी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या शाळेतील शिक्षक सुभाष भोसले (रा. कासेगाव, ता. पंढरपूर) हे नुकतेच सात दिवस अर्जित रजेवर होते.

१२ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजता सुभाष भोसले हे पोतदार यांच्या घरी येऊन, “माझ्या रजेचे रोखीकरण का थांबवले?” असे विचारून वाद घालू लागले. त्यानंतर त्यांनी हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. हा प्रकार पाहून फिर्यादी पोतदार यांच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, तिलाही शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी सुभाष भोसले यांच्याविरुद्ध मारहाणीचा व शिवीगाळीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात झालेल्या या वादामुळे पालकवर्गातही चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!