Homeशिक्षण-प्रशिक्षणकौतुकास्पद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोडी लिपीचा दुर्मिळ शैक्षणिक प्रयोग,आगळ्यावेगळ्या प्रयोगाची सर्वत्र...

कौतुकास्पद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोडी लिपीचा दुर्मिळ शैक्षणिक प्रयोग,आगळ्यावेगळ्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा

नंदेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोडी लिपीचा दुर्मिळ शैक्षणिक प्रयोग,आगळ्यावेगळ्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क
नंदेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बंडगरवाडी येथे मोडी लिपी शिकवण्याचा एक दुर्मिळ आणि कौतुकास्पद शैक्षणिक प्रयोग राबवला जात आहे. या उपक्रमाची संकल्पना शाळेतील सहशिक्षक महादेव क्षीरसागर यांची असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग यशस्वीपणे सुरू आहे.

महादेव क्षीरसागर हे नेहमीच नावीन्यपूर्ण आणि वेगळ्या शैक्षणिक संकल्पना राबवून विद्यार्थ्यांना दर्जेदार व संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ आधुनिक शिक्षणच नव्हे तर आपल्या समृद्ध इतिहासाची व संस्कृतीची ओळखही होत आहे.

मोडी लिपी ही मराठी भाषेचा आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा एक महत्त्वाचा ठेवा असून, इतिहास, प्रशासन व साहित्याच्या अभ्यासासाठी तिचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. लहान वयातच विद्यार्थ्यांना मोडी लिपीचे धडे मिळाल्याने त्यांच्यात इतिहासाविषयी आवड निर्माण होत असून सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याची जाणीव विकसित होत आहे.

या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात असून, इतर शाळांनीही अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नंदेश्वर येथील हा उपक्रम निश्चितच इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

अलीकडच्या काळातील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता पाहता त्यांना नियमित अभ्यासाबरोबर वेगवेगळ्या संकल्पना राबवून अध्यापन करणे गरजेचे आहे. यातून मी माझ्या शाळेत मोडी लिपी तर शिकवित आहेच. याबरोबर बुद्धिबळ, अबॅकस अशा प्रकारच्या अनेक संकल्पना राबवित आहे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चांगल्या प्रकारे चालना मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या नियमित अभ्यासाबरोबर राबविलेल्या वेगवेगळ्या संकल्पनांना विद्यार्थ्यांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महादेव क्षीरसागर
सहशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंडगर वाडी नंदेश्वर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!