Homeराजकीयमोठी बातमी..प्रदीप खांडेकर यांना दादासाहेब दोलतडे यांचा बिनशर्त पाठिंबा; दोलतडे गटाच्या स्नेहमेळाव्यात...

मोठी बातमी..प्रदीप खांडेकर यांना दादासाहेब दोलतडे यांचा बिनशर्त पाठिंबा; दोलतडे गटाच्या स्नेहमेळाव्यात समर्थकांची मोठी गर्दी

नंदेश्वर / विशेष प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रदीप खांडेकर, पंचायत समिती गणाचे उमेदवार आप्पासो निकम यांना मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील मोठे नेते दादासाहेब दोलतडे यांनी बिनशर्त जाहीर पाठिंबा दिल्याने स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे दादासाहेब दोलतडे यांनी भोसे गटामधूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला असतानाही विकासाच्या मुद्द्यावर भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

स्नेहमेळाव्याला समर्थकांची गर्दी
नंदेश्वर येथील माऊली पेट्रोलियम येथे दादासाहेब दोलतडे यांच्या उपस्थितीत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्यास दोलतडे समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रदीप खांडेकर तसेच भोसे पंचायत समिती गणाचे उमेदवार आप्पासो निकम यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांसमोर दोघांनाही जाहीर पाठिंबा देण्यात आला.

दादासाहेब दोलतडे यांच्या पाठिंब्याने आमची ताकद वाढली – प्रदीप खांडेकर
याप्रसंगी बोलताना प्रदीप खांडेकर म्हणाले, दादासाहेब दोलतडे यांनी विकासाच्या मुद्द्यावर माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. यापुढे नंदेश्वर गावाचा आणि संपूर्ण परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही दोघे मिळून प्रामाणिकपणे प्रयत्न करू. जनतेने दाखवलेला विश्वास कधीही तडा जाऊ देणार नाही. दादासाहेब दोलतडे यांच्या या पाठिंब्यामुळे भोसे जिल्हा परिषद गटात आमची ताकद अधिक वाढली असून, आगामी निवडणुकीत याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील

आ. समाधान आवताडे यांचे विकासदृष्टी पाहूनच भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा – गुरुलिंग दोलतडे
माजी ग्रा.पं.सदस्य गुरुलिंग दोलतडे यांनी आपल्या भाषणात आ. समाधान आवताडे यांच्या विकासदृष्टीचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, आ. समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. त्यांची दूरदृष्टी आणि विकासाभिमुख भूमिका पाहूनच दोलतडे गटाने भोसे जिल्हा परिषद गटातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. नंदेश्वर गावातून प्रदीप खांडेकर आणि आप्पासो निकम या दोन्ही उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास आणि आशावाद मी व्यक्त करतो.

या स्नेहमेळाव्यास दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन पाटील, शिरनांदगीचे सरपंच गुलाब थोरबोले, नंदेश्वरचे माजी सरपंच गेणा दोलतडे, उपसरपंच आनंदा पाटील, ग्रामपंचायत सदस्य तानाजी मोटे, माजी उपसरपंच राहुल कसबे, संतोष कांबळे यांच्यासह नंदेश्वर व परिसरातील अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगतची धोकादायक विहीर बुजविण्यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने बोलाविली विशेष ग्रामसभा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न...

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगत आणि नंदेश्वर गावाच्या हद्दीत असलेली धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याच्या मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसाय समाविष्ट करा, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप...

नंदेश्वर | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर धोरणात मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसायाचा समावेश करावा, अशी मागणी...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नंदेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्रलंबित प्रश्नांचे काय???

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

error: Content is protected !!