Homeक्राईमसंतापजनक...जन्मदात्या बापानेच तोडले मुलीच्या शरीराचे लचके! काका अन् आजोबांनीही वारंवार.. मुलीने शिक्षकांसमोर...

संतापजनक…जन्मदात्या बापानेच तोडले मुलीच्या शरीराचे लचके! काका अन् आजोबांनीही वारंवार.. मुलीने शिक्षकांसमोर फोडला टाहो; प्रकार ऐकून तळपायाची आग मस्तकात

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क
अकोला: अकोला जिल्ह्यातील (Shocking Crime) तेल्हारा तालुक्यातून माणुसकीला काळीमा (Crime News) फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अडसूळ नावाच्या (Akola News) गावात एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या वडिलांनी, काकाने आणि शेजारी राहणाऱ्या (Akola Crime) एका आजोबाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
ही पीडिता केवळ १२ वर्षे ८ महिने आणि २२ दिवसांची असून, तिच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून घरातील आणि ओळखीच्याच नराधमांकडून अत्याचार सुरू होता. (Latest Breaking News)

मुलीला त्रास असह्य
हा सर्व प्रकार तेव्हा उघड झाला जेव्हा पीडित मुलीला होणारा त्रास असह्य झाला. तिने मोठ्या धैर्याने आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांकडे धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. योगायोगाने त्याच वेळी शाळेत चाईल्ड लाईनच्या महिला अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक गणेश ठाकरे आणि चाईल्ड लाईनच्या पथकाने घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तेल्हारा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.

तिसरा आरोपी फरार
पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा क्रमांक ३८२/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नराधम वडील आणि शेजारी राहणारा आजोबा गजानन भोम या दोघांना तातडीने अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील तिसरा आरोपी असलेला पीडितेचा काका सध्या फरार आहे. तो गेल्या २० दिवसांपासून पुणे येथे असल्याची माहिती समोर आली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून शोषण
मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे वडील आणि काका गेल्या सहा महिन्यांपासून तिचे शोषण करत होते. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या आजोबानेही तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. शाळेतील शिक्षकांनी दाखवलेली सतर्कता आणि पोलिसांनी केलेली तातडीची कारवाई यामुळे या नराधमांचे कृत्य समोर येऊ शकले. पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपीला पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!