Homeक्राईमतोतया विद्यार्थी..नंदेश्वर येथे दहावीच्या परीक्षा केंद्रावर तोतया विद्यार्थ्यांचा मोठा पर्दाफाश; २० जणांवर...

तोतया विद्यार्थी..नंदेश्वर येथे दहावीच्या परीक्षा केंद्रावर तोतया विद्यार्थ्यांचा मोठा पर्दाफाश; २० जणांवर गुन्हा, १० जणांना चार दिवसांची पोलीस कोठडी

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर (ता. मंगळवेढा) : येथील श्री बाळकृष्ण विद्यालय या दहावीच्या परीक्षा केंद्रावर मूळ विद्यार्थ्यांऐवजी तोतया विद्यार्थी बसवून परीक्षा देण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी १० जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या आरोपींना २४ फेब्रुवारीपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासादरम्यान धक्कादायक प्रकार उघड
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र संचालक विठ्ठल एकमल्ली यांची दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षा सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी केंद्र संचालकांवर असून त्यासाठी २५ पर्यवेक्षक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पेपर सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीट व शाळेच्या ओळखपत्रांची तपासणी करण्यात येत असताना हा प्रकार उघड झाला. परीक्षा यादीप्रमाणे पडताळणी करताना काही विद्यार्थ्यांच्या ओळखीत तफावत आढळून आली.

विविध वर्गांमध्ये तोतया विद्यार्थी आढळले
तपासणीदरम्यान खालीलप्रमाणे प्रकार समोर आले —
परीक्षा क्रमांक C 262502 असलेल्या रोहित चौधरी यांच्या नावावर विश्वजीत उर्फ बाबू चव्हाण परीक्षा देताना आढळला.
प्रज्योत जाधव यांच्या नावावर वैभव पवार, राकेश कुंभार यांच्या नावावर सचिन बोधगिरे, मंगेश कदम यांच्या नावावर प्रकाश अडळगी, तुकाराम थोरवे यांच्या नावावर समाधान रुपनर, भक्ती जोशी यांच्या नावावर प्रिती बिराजदार, निखिल पाटील यांच्या नावावर आकाश पाटील, प्रतिक मंडले यांच्या नावावर प्रकाश बिराजदार, श्रीकांत सावंत यांच्या नावावर धर्मात्मा आझाद, शुभम जांगळे यांच्या नावावर रोहित बांदल परीक्षा देताना आढळून आले. काही तोतया विद्यार्थ्यांकडे हॉलतिकीट किंवा ओळखपत्र नव्हते, तर काहींकडे बनावट शिक्के मारलेली हॉलतिकीटे आढळली.

बनावट शिक्क्यांचा वापर
तपासादरम्यान मिळालेल्या हॉलतिकिटांवर सुतार इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यु. कॉलेज असा रबरी शिक्का मारलेला असल्याचे दिसून आले. काही हॉलतिकिटांवर निळ्या रंगाचा बनावट शिक्का होता. एका आरोपीकडून हॉलतिकिटाची झेरॉक्स प्रतही जप्त करण्यात आली आहे. एसएससी बोर्डाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर तपासणी केली असता हॉलतिकिटांमधील माहिती व प्रत्यक्ष बसलेले विद्यार्थी यांच्यात मोठी तफावत आढळून आली.

आरोपी बाहेरच्या जिल्ह्यांतील
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे तोतया विद्यार्थी कोल्हापूर, सांगली व बेळगाव परिसरातील असून सर्वजण १८ वर्षांवरील आहेत. या प्रकरणामागे संघटित टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पुढील तपास सुरू
सहाय्यक पोलीस निरीक्षक लातुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून उर्वरित आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून परीक्षा प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

error: Content is protected !!