Homeराजकीयमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्षपदी धनाजी गडदे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्षपदी धनाजी गडदे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्षपदी धनाजी गडदे
नंदेश्वर/ प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी दक्षिण भागातील नंदेश्वर ता.मंगळवेढा येथील युवक नेते धनाजी गडदे यांची निवड करण्यात आली आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते धनाजी गडदे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी मनसेचे सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थित रविवारी मंगळवेढा येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे पार पडली.

धनाजी गडदे यांनी याआधी राष्ट्रीय समाज पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदावर सलग दहा वर्षे काम केले आहे. याशिवाय भाजपा ओबीसी मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पदी तीन वर्ष काम पाहिले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्या काळात नवीन पक्ष असणाऱ्या रासपाला धनाजी गडदे यांनी मोठ्या प्रमाणावर न्याय दिला होता. गावोगावी रासपचे कार्यकर्ते तयार केले होते. त्यानंतर भाजपा ओबीसी मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी देखील त्यांचे काम वाखाणण्याजोगे होते. त्यांच्या या सर्व कामाची दखल घेऊन गडदे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.
व्यासपीठावर मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, समन्वयक नारायण गोवे, उपजिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार, पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,सांगोला तालुकाध्यक्ष अनिल केदार, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, शहराध्यक्ष संतोष कवडे, संघटक गणेश पिंपळनेरकर, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष अवधूत गडकरी व उप शहराध्यक्ष प्रदीप परचंडे,उप तालुकाअध्यक्ष कृष्णा ताड इत्यादी उपस्थित होते.

चौकट
सत्तेत सहभागी होऊन कार्यकर्त्यांची जनतेची कामे करण्यापेक्षा विरोधी पक्षात राहून कामे जलद होतात हा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे. म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. यापुढे कडवट विरोधी पक्ष कसा असतो आम्ही सत्ताधाऱ्यांना दाखवून देवु.
धनाजी गडदे
तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

काँग्रेस सेवा दलाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी बजरंग चौगुले

नंदेश्वर/ प्रतिनिधी : काँग्रेस सेवा दलाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी बजरंग चौगुले यांची निवड करण्यात आली आहे. बजरंग चौगुले यांनी यापूर्वी मंगळवेढा काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष...

काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी संदीप पवार

नंदेश्वर / प्रतिनिधी : तालुका काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप पवार यांची निवड करण्यात आली असून, या निवडीमुळे पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक बळकटीला नवे...

माझ्या पदाचा वापर शेतकऱ्यांच्या कल्याणसाठीच करीन..कृषी उपसंचालक सोनाली दोलतडे यांचा नंदेश्वरमध्ये जंगी सत्कार, गावातून...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावची भूमिपुत्री सोनाली जगन्नाथ दोलतडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत कृषी उपसंचालक...

जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्काराने बंडू गडदे यांना करण्यात आले सन्मानित, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री स्मिता...

नंदेश्वर / प्रतिनिधी : शिरनांदगी येथील विविध शैक्षणिक संस्थांचे संस्थापक आणि भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी बंडू शंकर गडदे यांना जिल्हास्तरीय “शिक्षण भूषण” पुरस्काराने गौरविण्यात...

खडकी येथील घोडके कुटुंबीयांना भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांचा आधार, आर्थिक मदत करत...

नंदेश्वर / प्रतिनिधी : खडकी (ता. मंगळवेढा) परिसरात नुकत्याच घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सरपण आणण्यासाठी गेलेल्या आईसह तिच्या दोन...

error: Content is protected !!