Homeताज्या बातम्याअनवली येथील सतू कृष्णा केणी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे लोकमान्य टिळक...

अनवली येथील सतू कृष्णा केणी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

अनवली येथील सतू कृष्णा केणी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

अनवली/ प्रतिनिधी
अनवली येथील सतू कृष्णा केणी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
गुलामगिरीच्या अंधारात स्वातंत्र्याची ज्योत पेटविणारे, स्वातंत्र्यलढ्याचे अखंड प्रेरणास्रोत व सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारे स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, थोर समाजसुधारक आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून स्वातंत्र्य संग्रामात चैतन्य निर्माण करणारे युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त व परिवर्तनवादी साहित्याचा डफ वाजवीत संकुचित, अन्यायकारक रूढी परंपरा आणि विचारांनी पछाडलेल्या समाजाचे डोळे उघडून दिन, दलित, गरिबांच्या आक्रोशाला दिशा देणारे समाजसुधारक लोककवी, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळ महाराष्ट्रातील मनामनात रुजवण्याचे फार मोठे कार्य केले. मराठी साहित्यातील जवळपास सर्व साहित्य प्रकार अण्णाभाऊंनी अत्यंत सक्षमपणे हाताळले. वंचित, पीडित आणि उपेक्षितांचा आवाज त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून बुलंद केला. त्यांचे लिखाण ज्वलंत, प्रेरणादायी आणि दिशादर्शक आहे. महाराष्ट्राच्या या थोर, प्रतिभासंपन्न समाजसुधारकास जयंती निमित्त अनवली येथील रयत शिक्षण संस्थेचे सतू कृष्णा केणी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज अनवली येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या मार्गदर्शनाखाली केले होते.

या कार्यक्रमामध्ये विद्यालयातील इ 5 वी ते इ 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाषणपर मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमात मा. मुख्याध्यापक आदरणीय श्री लोकरे यु एम साहेब यांच्या उपस्थितीत मा श्री सौदागर डी डी सर यांनी महापुरुषांचे विचार आपल्या आचरणात आणून आपले व्यक्तीमत्त्व घडविण्याचा प्रयत्न करावा असे मार्गर्शन केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील जेष्ठ शिक्षिका सौ शिंदे मॅडम, सौ उंबरे मॅडम, श्री लेंडवे सर, श्री करणावर सर, श्री कोळी सर, श्री सुर्यवंशी सर, वरिष्ठ लेखनिक श्री पडवळे सर व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नंदेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्रलंबित प्रश्नांचे काय???

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!