Homeताज्या बातम्यानंदेश्वर येथे श्री कोंडीराम महाराज पुण्यतिथी सप्ताह सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नंदेश्वर येथे श्री कोंडीराम महाराज पुण्यतिथी सप्ताह सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नंदेश्वर /प्रतिनिधी
नंदेश्वर ता.मंगळवेढा येथील श्री कोंडीराम महाराज पुण्यतिथी सप्ताह सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री कोंडीराम महाराज सेवा मंडळाचे विश्वस्त संगमेश्वर नंदेश्वरकर महाराज यांनी दिली आहे. शुक्रवार दि.५ सप्टेंबर ते सोमवार दि.८ सप्टेंबर या चार दिवसांच्या काळात पुण्यतिथी सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे. शुक्रवार दि.५ रोजी श्री कोंडीराम महाराज मठाचे मठाधिपती श्री तुकाराम महाराज नंदेश्वर कर यांचे हस्ते विना पूजन होऊन पुण्यतिथी सप्ताह सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. सुरेश कांबळे महाराज आलेगाव आणि राजाराम खडतरे महाराज सांगोला यांचे प्रवचन होईल. हनुमान भजनी मंडळ एकतपुर यांचा हरी जागराचा कार्यक्रम होईल. गजानन खुळे यांचे अन्नदान होईल.

शनिवार दि. ६ रोजी नंदेश्वर येथील भाविक भक्त श्रीक्षेत्र इंचगिरी येथे नामज्योत आणण्यासाठी प्रयाण होतील. संजय मासाळ महाराज यांचे प्रवचन होईल. हनुमान भजनी मंडळ हाजापूर यांचा हरीजागराचा कार्यक्रम होईल. राजाराम मेटकरी, मोहन मेटकरी यांच्या वतीने अन्नदान होईल. रविवार दिनांक ७ रोजी सायंकाळी ठीक चार वाजता श्री कोंडीराम महाराज यांच्या पालखीचे भव्य मिरवणूक निघणार आहे. श्रीधर पाटील आणि श्रीकांत पाटील यांचे प्रवचन होईल. श्रीधर पाटील केरळ ही या दिवशीच्या अन्नदाते असणार आहेत.

सोमवार दिनांक आठ रोजी सकाळी आठ ते नऊ संगीत भजन होईल. सकाळी ८ वा.पासून श्रीक्षेत्र इंचगिरी मठाचे मठाधिपती रेवणसिद्ध महाराज, कोंडीराम महाराज मठाचे मठाधिपती श्री तुकाराम महाराज, अंबन्ना महाराज वळसंग या प्रमुख प्रवचनकारांसहित बजरंग फडतरे महाराज, विवेकानंद आरळी महाराज, दुधगे गुरुजी महाराज, देविदास महाराज, नवनाथ भंडारे महाराज, दत्तात्रय महाराज गुलबर्गा, ईश्वर सागर महाराज, सुभाष बोचरे महाराज, पुरुषोत्तम लवटे महाराज, सुनिता लवटे महाराज तनाळी, अभिमन्यू कांबळे महाराज, शशिकांत शिवनूर महाराज, व्हनमराठे सर महाराज, शिवाजी महाराज तनाळी यांचेही प्रवचन होईल. संपूर्ण सप्ताह काळात महिपती मोरे महाराज हाजापूर, जालिंदर चौगुले महाराज महिम, हरी घाडगे महाराज महिम आणि यानंतर ठीक बारा वाजता पुष्पवृष्टी होऊन महाप्रसादानंतर या पुण्यतिथी सप्ताह सोडण्याची सांगता करण्यात येणार आहे. शेवटच्या दिवशी बसवराज गोलभावे हे अन्नदाते असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

error: Content is protected !!