श्री माऊली महिला पतसंस्थेच्या वतीने गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न…
(टीम सोलापूर आजतक)
नंदेश्वर तालुका मंगळवेढा येथील श्री माऊली महिला पतसंस्थेच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी नंदेश्वर गावचे सुपुत्र सुनील कसबे यांची निवड झाल्याबद्दल व तसेच एस.आर.पी. मध्ये नुकतेच भरती झालेले प्रशांत कटारे यांचाही सत्कार करण्यात आला.

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या व ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रात नावलौकिक पावलेल्या श्री माऊली महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था नंदेश्वरचे चेअरमन आण्णासाहेब बंडगर आणि संचालक मंडळाने डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुनील कसबे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात केला. तसेच एस आर पी मध्ये नुकतेच भरती झालेले प्रशांत कटारे यांचाही सत्कार केला.


याप्रसंगी श्री माऊली पतसंस्थेचे चेअरमन आण्णासाहेब बंडगर, शिवसेना तालुकाप्रमुख पै.अशोक चौंडे, माजी उपसरपंच राहुल कसबे, मार्गदर्शक सुधीर गरंडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब सासणे, ,उपाध्यक्ष पोपट बंडगर, बाबुराव मोटे, नवनाथ मेटकरी, डॉ.परमेशा माळी, नानासाहेब बंडगर, अनिल लवटे, दिगंबर गरंडे, भाऊसाहेब बेलदार, राजू खांडेकर, प्रसाद कसबे, शितल कसबे, रमेश कसबे, सागर गरंडे, विशाल कांबळे, सुभाष खांडेकर, यांच्यासह पतसंस्थेचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
*******************
समाजातील गुणवंतांचे कौतुक करण्यात श्री माऊली पतसंस्था नेहमीच अग्रेसर…
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील नंदेश्वर व तसेच आसपासच्या पंचक्रोशीतील ज्या ज्या गुणवंतांनी यश मिळविले आहे अशा गुणवतांचे कौतुक करण्यात श्री माऊली पतसंस्था नेहमीच अग्रेसर राहिली आहे. यश मिळविलेल्या गुणवंतांचे कौतुक केल्यानंतर त्यांना जितका आनंद होतो तितकी त्यांची जबाबदारी देखील वाढते असे मनोगत यावेळी श्री माऊली पतसंस्थेचे मार्गदर्शक, श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक नवनाथ मेटकरी यांनी यावेळी व्यक्त केले























