अनिल सावंत, राहुल शहा यांचेसह शिष्टमंडळाने घेतली आ.शशिकांत शिंदे यांची भेट.
नंदेश्वर /प्रतिनिधी
शरद पवार साहेबांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत व तसेच विकासात मोलाचे योगदान आहे. याची जाणीव महाराष्ट्रातील जनतेला आहे. आगामी काळात पवार साहेबांच्या विचारांचाच विजय होणार आहे. त्यामुळे तुम्ही पक्ष वाढीकडे लक्ष द्या पक्षाची लागेल ती ताकद तुमच्या पाठीमागे उभी करतो असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, भैरवनाथ शुगर चे व्हा. चेअरमन अनिल सावंत यांच्यासह मंगळवेढा येथील रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांच्या नेतृत्वाखाली आमदार शशिकांत शिंदे यांचे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा कोरेगाव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेत सत्कार केला. यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच आमदार शशिकांत शिंदे यांनी हा विश्वास दिला.

यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना आ.शिंदे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार साहेबांच्या विचाराचा मतदार संघ आहे. या मतदारसंघात आपल्याला यश नक्की मिळेल. त्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले.यावेळी मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, संतोष रंधवे हे उपस्थित होते.
9




















