Homeताज्या बातम्यानंदेश्वर येथे श्री मलूआई देवी यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत, समाजोपदेशक व्याख्यान, कुस्त्यांचे मैदान,...

नंदेश्वर येथे श्री मलूआई देवी यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत, समाजोपदेशक व्याख्यान, कुस्त्यांचे मैदान, मनोरंजक ऑर्केस्ट्रा अशाप्रकारे वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन

(टीम सोलापूर आजतक)
नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथे श्री मलूआई यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रेचे संयोजक शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे यांनी दिली आहे. मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट आणि गुरुवार दिनांक १४ ऑगस्ट या तीन दिवसात श्री मलुआई देवीची यात्रा संपन्न होणार आहे. बैलगाडा शर्यत, समाजोपदेशक व्याख्यान, कुस्त्यांचे मैदान, मनोरंजक ऑर्केस्ट्रा अशाप्रकारे वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन यात्राकमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी बैलगाडा शर्यतीचे मैदान होणार आहे. तसेच बुधवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी किशोरवयीन विद्यार्थी-विद्यार्थ्यांना उपदेशक असे राज्यभरात गाजलेले व्याख्याते वसंत हंकारे यांचे व्याख्यान नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण विद्यालयात संपन्न होणार आहे. या व्याख्यानाचे उद्घाटन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख महेश साठे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, नंदेश्वरच्या ग्रामसेविका एस.एन.इंगोले, तलाठी महेश राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

बुधवारी रात्री ठीक सात वाजता महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय असलेला वैभव आर्केस्ट्रा संपन्न होणार आहे. शिवसेना मंगळवेढा शहर प्रमुख प्रतिक किल्लेदार यांचे हस्ते आर्केस्ट्राचे उद्घाटन होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू बाबर हे उपस्थित असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपतालुकाप्रमुख रामलिंग नकाते विभाग प्रमुख नंदकुमार व्हरे, उपशहर प्रमुख महादेव गोसडे, उपतालुकाप्रमुख समाधान खरात, विभाग प्रमुख शिवाजी गोरडे, युवा उद्योजक राहुल ताड हे उपस्थित राहणार आहेत.

गुरुवार दिनांक १४ रोजी सकाळी ११ वाजता देवीवर पुष्पवृष्टी होणार आहे यानंतर सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. दुपारी ठीक तीन वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान होणार आहे. या मैदानाचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते होणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. यावेळी धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, धनश्री मल्टीस्टेटचे संचालक रामचंद्र बंडगर, बबन पाटील हे उपस्थित राहणार आहेत. नंदेश्वर तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी श्री मलुआई देवीच्या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन संयोजक अशोक चौंडे आणि यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कौतुकास्पद…प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने मसनेरवस्ती शाळेत स्पोर्ट्स किटचे वाटप, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून...

नंदेश्वर / प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसनेरवस्ती येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. प्रेरणा स्पोर्ट गारमेंटचे...

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

error: Content is protected !!