Homeताज्या बातम्यासोलापुरात शिंदे सेनेला पडणार भगदाड.. सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत आणि सोलापूरचे...

सोलापुरात शिंदे सेनेला पडणार भगदाड.. सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत आणि सोलापूरचे माजी महापौर दिलीप कोल्हे यांच्यासह अनेक पदाधिकारी करणार भाजपमध्ये प्रवेश.. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रा.शिवाजी सावंत यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल..

(टीम सोलापूर आजतक)
गेल्या 30 ते 35 वर्षांपासूनच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील वजनदार नेतृत्व असलेले शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी पक्षांतर्गत कुरघोड्यांना वैतागून पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ पक्षाचे माढा तालुका प्रमुख मनोज साठे यांच्यासह पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे पाठवले होते. मात्र पक्षाने कोणतीही दखल न घेतल्याने अखेर प्रा. सावंत समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असून याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान प्रा. सावंत यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाकडून प्रा. सावंतांसह पद सर्व पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केली जाईल व प्रा.सावंत पुन्हा शिवसेना शिंदे गटातच ताकतीने काम करतील असा राजकीय अभ्यासकांचा अंदाज होता. मात्र शनिवारी माढ्यात प्रा. सावंत गटाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात पंधरा दिवसांनंतरही पक्षाकडून कसलीही विचारपूस झाली नसल्याचे सांगत प्रा. सावंत समर्थकांसह शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करणार असल्याचे उघड संकेत दिले होते.

माढा येथील जगदाळे मंगल कार्यालयात शनिवारी झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यानंतर दोन दिवसात जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत वेगवान घडामोडी घडल्याचे कळते आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत प्रा.शिवाजी सावंत यांची भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचीही माहिती असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रवेश याबाबत चर्चा करण्यासाठी प्रा.सावंत यांना मुंबईला बोलवलेचेही वृत्त हाती आली आहे. त्यामुळे लवकरच प्रा.सावंत यांच्यासह सोलापूरचे माजी महापौर दिलीप कोल्हे यांच्यासह राजीनामा दिलेले सर्व पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हातात कमळ घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रा.शिवाजी सावंत यांनी हातात गुलाब घेतलेला एक फोटो ही सोमवारी सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे.

* दिलीप कोल्हे करणार भाजपमध्ये प्रवेश
शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्यासह अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या दोन-तीन दिवसात या पक्षप्रवेशाची तारीख आणि ठिकाण निश्चित करण्यात येणार आहे अशी माहिती स्वतः दिलीप कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्र्यांनी भाजप प्रवेशाची तारीख दिल्यानंतर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे कोल्हे म्हणाले. या पत्रकार परिषदेत हरिभाऊ चौगुले, जवाहर जाजू ,समर्थ मोटे, मयूर झांबरे, आशिष परदेशी, मनोज चकोलेकर, सागर शिंदे, सुनील निंबाळकर आजी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!