Homeताज्या बातम्यामंगळवेढ्यात महिला हॉस्पिटलच्या विरोधात अन्नत्याग आंदोलन, अवाच्यासव्वा बिल आकारणी, इनामी कब्रस्तानच्या जागेवर...

मंगळवेढ्यात महिला हॉस्पिटलच्या विरोधात अन्नत्याग आंदोलन, अवाच्यासव्वा बिल आकारणी, इनामी कब्रस्तानच्या जागेवर अतिक्रमण यासह अनेक आरोप, तब्बल सहा दिवसानंतर कारवाईच्या आश्वासनाने आंदोलन मागे…

मंगळवेढा/ तालुका प्रतिनिधी
मंगळवेढा शहरातील महिला हॉस्पिटलच्या विरोधात अवाच्यासव्वा बिल आकारणी, इनामी कब्रस्तानच्या जागेवर अतिक्रमण यासह अनेक आरोप करत नारायण गोवे यांनी तब्बल सहा दिवस पडत्या पावसात सुरू ठेवलेले अन्नत्याग आंदोलन कारवाईच्या आश्वासनाने आंदोलन मागे घेतले आहे. यामध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे आणि मंगळवेढा तालुकाध्यक्ष धनाजी गडदे यांनी यशस्वी मध्यस्थी केली.

दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रूग्णालय, मंगळवेढा यांचे कार्यालयासमोर म.न.से. जिल्हा बापू समन्वयक नारायण गोवे हे महिला हॉस्पिटलच्या विरोधात अन्नत्याग उपोषणास पडत्या पावसात तब्बल सहा दिवस बसले होते. दरम्यान वैद्यकिय अधिक्षक डॉ. सुलोचना जानकर यांनी दि.२० रोजी कारवाईचे लेखी पत्र दिल्याने तूर्त हे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे गोवे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

डॉ. नंदकुमार शिंदे यांचे बोराळे नाका येथे जय महिला हॉस्पीटल असून हॉस्पिटलचे नूतनीकरण दि.३१/३/२०२५ रोजी काही त्रुटीमुळे झालेले नव्हते. तरीसुद्धा महिला हॉस्पिटल राजरोसपणे चालू होते. तेव्हा गोवे यांनी आरोग्यमंत्री, बॉम्बे नर्सिंग असोसिएशन, जिल्हा शल्य चिकित्सक. सोलापूर, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा, मंगळवेढा पोलिस स्टेशन, मुख्याधिकारी नगरपालिका सर्वांना कळवून सुद्धा हॉस्पिटल सील केलेले नाही.

हॉस्पिटलने अतिक्रमण करून शेजारी हॉटेल, मेडिकल दु‌कान, दोन गाळे भाडयाने देणे ही जागा देवस्थान ईनामी कबरस्थानची असून सुद्धा नगरपालिकेने बांधकाम परवाना कसा काय दिला? ही जागा कुठे वर्ग केली? गरोदर महिलांची डिलेव्हरीचे बील ६० ते ७० हजार रूपये घेवून गोरगरीबांवर अन्याय केला जातो.

दि.९/७/२०२५ ला नूतनीकरण केले तेव्हा महिला हॉस्पिटलचे नाव मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असे केले आहे. तसे ३ महिने ८ दिवस महिला हॉस्पिटल अनाधिकृतपणे सुरू होते. गोवे यांनी सर्व शासकीय ऑफिसला कळवून सुद्धा हॉस्पिटल सिल केले नाही तसेच गुन्हाही दाखल केलेला नाही, दंडही केलेला नाही.

म्हणून नारायण गोवे अन्नत्याग उपोषणास ६ दिवस बसल्यावर दि.२०/८/२०२५ रोजी दुपारी १२ वाजता म.न.से. नेते मा.दिलीप धोत्रे येवून वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस.एल. जानकर यांना उपोषणाच्या ठिकाणी बोलावून त्यांच्याकडून योग्य कारवाई करण्यात येईल असे पत्र घेण्यात आले व उपोषणास स्थगिती देण्यात आली. यावेळी दिलीप धोत्रे व डॉ.सौ.एस.एल. जानकर यांनी लेखी आश्वासन दिल्यावर अन्नत्याग उपोषण सोडण्यात आले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पवार, पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील, मंगळवेढा तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, पिंपळकर गणेशराव, शहर उपाध्यक्ष राहुल पांढरे, श्रीकांत पवार, श्रीकांत जाधव, अमोल पवार, कृष्णा ओमने, अमर खंदारे, तालुका उपाध्यक्ष रवि कांबळे, बालाजी भोजने, उ.बा.ठा. जिल्हा उपाध्यक्ष क्रांती दत्तू, शहराध्यक्ष बापू खराडे, डी. के. साखरे, येताळा खरबडे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बंडू गडदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा होणार सन्मान, जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार जाहीर

मंगळवेढा / प्रतिनिधी : दैनिक दामाजी एक्सप्रेस तर्फे भव्य जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार...

लोकशाहीर दादाभाई शेख यांचे दुर्दैवी निधन, खडकी गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावाच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारे, आपल्या शाहिरीच्या दमदार आवाजाने गेली तब्बल ४५ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खडकीचे नाव...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...

शिरनांदगी गुरुकुल संस्थेत अकरावी प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन फॉर्म व संपूर्ण मार्गदर्शनाची सुविधा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथील न्यू इंडियन गुरुकुल आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स ज्युनिअर कॉलेजतर्फे अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेशोत्सव...

error: Content is protected !!