Homeताज्या बातम्या52 व्या हिंदकेसरी स्पर्धेत महेंद्र गायकवाडचा दमदार विजय; पृथ्वीराज मोहोळ दुखापतीमुळे माघार

52 व्या हिंदकेसरी स्पर्धेत महेंद्र गायकवाडचा दमदार विजय; पृथ्वीराज मोहोळ दुखापतीमुळे माघार

सातारा / विशेष प्रतिनिधी : ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियम येथे रंगलेल्या 52 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिरशी गावचा पैलवान महेंद्र गायकवाड याने मानाची हिंदकेसरी गदा पटकावत महाराष्ट्राच्या कुस्तीविश्वात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. अंतिम फेरीत त्याने पुण्याच्या तगड्या मल्ल पृथ्वीराज मोहोळ याच्यावर मात केली.

अंतिम फेरीत काय घडलं?
पुरुष गटातील अंतिम सामना महाराष्ट्रातील दोन बलाढ्य मल्लांमध्ये रंगला होता. हिंदकेसरी किताबासाठी संपूर्ण मैदानात प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पै. महेंद्र गायकवाड यांनी आक्रमक खेळी करत डाव टाकण्यास सुरुवात केली. याच दरम्यान महेंद्र गायकवाडने जोरदार पकड घेत पृथ्वीराज मोहोळचा हात पिळला. या चढाओढीत पृथ्वीराजच्या हाताला गंभीर दुखापत झाली. वेदना असह्य झाल्याने वैद्यकीय पथकाने तातडीने मैदानात धाव घेतली. डॉक्टरांनी पुढील धोका लक्षात घेऊन पृथ्वीराजला सामना न खेळण्याचा सल्ला दिला. अखेर पृथ्वीराज मोहोळने मैदानातून माघार घेतली. प्रतिस्पर्ध्याने माघार घेतल्यानंतर पंचांनी महेंद्र गायकवाडला 52 व्या हिंदकेसरी स्पर्धेचा अधिकृत विजेता घोषित केले. विजयाची घोषणा होताच स्टेडियममध्ये जल्लोष उसळला.

मानाची गदा, थार गाडी आणि रोख बक्षीस
हिंदकेसरी किताब जिंकल्यानंतर महेंद्र गायकवाड याचा मानाची चांदीची गदा देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर बक्षीस म्हणून त्याला तब्बल ‘महिंद्रा थार’ गाडी आणि रोख रक्कम प्रदान करण्यात आली. उपविजेता पृथ्वीराज मोहोळ यालाही ट्रॅक्टर देऊन सन्मानित करण्यात आले.

उपांत्य फेरीत दोन्ही मल्लांचा संघर्ष
अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही मल्लांना उपांत्य फेरीत जबरदस्त संघर्ष करावा लागला होता. पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने दिल्ली एनसीआरच्या रजतविरुद्ध दमदार खेळी करत 6-2 अशा गुणांच्या फरकाने विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे महेंद्र गायकवाड आणि दिल्लीच्या अनिरुद्ध यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. दोन्ही मल्लांमध्ये गुणांची चढाओढ सुरू असताना महेंद्रने आपल्या अफाट ताकदीच्या जोरावर अनिरुद्धला चितपट केले. त्याने हा सामना 9-7 अशा फरकाने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.

महिला हिंदकेसरी किताब हरियाणाच्या काजलकडे
महिला गटातही रोमांचक सामने पाहायला मिळाले. अंतिम सामन्यात दिल्लीची खुशी दलाल आणि हरियाणाची काजल डोचक यांच्यात थेट लढत झाली. काजलने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत खुशी दलालला एकही गुण मिळू दिला नाही. तिने 7-0 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवत ‘महिला हिंदकेसरी 2026’ किताब आपल्या नावावर केला. या विजयाबद्दल तिला मानाची गदा आणि ‘अल्टो’ कार देऊन गौरविण्यात आले.

संघर्षातून घडलेला हिंदकेसरी
महेंद्र गायकवाड याचा हा विजय विशेष मानला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिरशी गावचा हा मल्ल यापूर्वी तीन वेळा उपमहाराष्ट्र केसरी राहिला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतही त्याला तीन वेळा विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. मात्र सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि ताकदीच्या जोरावर अखेर त्याने हिंदकेसरीचा बहुमान पटकावत आपल्या कुस्ती कारकिर्दीतील सर्वात मोठे यश संपादन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आदर्शवत लोकसहभाग ! खुपसंगी-आंधळगाव परिसरातील जळालेल्या झाडांना जीवनदान देण्याचा प्रेरणादायी उपक्रम, श्री कामसिद्ध शेडनेट...

नंदेश्वर / प्रतिनिधी : खुपसंगी-आंधळगाव हद्दीवरील वनिकरण क्षेत्रात अलीकडेच लागलेल्या भीषण आगीत अनेक झाडांचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे जळून खाक झाली असून उरलेली...

आदर्शवत लोकसहभाग….खुपसंगी-आंधळगाव परिसरातील जळालेल्या झाडांना जीवनदान देण्याचा प्रेरणादायी उपक्रम, श्री कामसिद्ध शेडनेट शेती शेतकरी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : खुपसंगी-आंधळगाव हद्दीवरील वनिकरण क्षेत्रात अलीकडेच लागलेल्या भीषण आगीत अनेक झाडांचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे जळून खाक झाली असून उरलेली...

नंदेश्वर केंद्रात श्री बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वरची स्नेहल खापे प्रथम, ओम खांडेकर द्वितीय, श्री. बाळकृष्ण...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील श्री. बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या दहावी (S.S.C.) बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय...

मंगळवेढ्यात मध्यरात्री भीषण आग : श्री जिजामाता कृषी केंद्र जळून खाक, माजी सभापती प्रदीप...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा शहरात गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले. पंचायत समितीचे माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रदीप...

काँग्रेस सेवा दलाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी बजरंग चौगुले

नंदेश्वर/ प्रतिनिधी : काँग्रेस सेवा दलाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी बजरंग चौगुले यांची निवड करण्यात आली आहे. बजरंग चौगुले यांनी यापूर्वी मंगळवेढा काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष...

error: Content is protected !!