भोसे / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून, याच अनुषंगाने आ. समाधान आवताडे यांचा प्रचार दौरा रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या प्रचार दौर्याअंतर्गत आ. समाधान आवताडे विविध गावांना भेटी देत स्थानिक मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, ग्रामीण विकासासाठी राबविण्यात आलेली कामे, भोसे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून विकास कसा साधता येईल, याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भाजप व मित्र पक्षांच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही ते करणार आहेत.

प्रचार दौऱ्याची सुरुवात सायंकाळी ४.०० वाजता मानेवाडी येथून होणार असून, त्यानंतर रेवेवाडी येथे सायं. ४.४५ वाजता, लोणार येथे सायं. ५.३० वाजता, पडोळकरवाडी येथे सायं. ६.१५ वाजता तर महमदाबाद (हू.) येथे सायं. ७.०० वाजता प्रचार सभा व भेटींचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यादरम्यान भाजप व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नेते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रचार दौरा महत्त्वाचा मानला जात असून, मंगळवेढा तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.























