Homeताज्या बातम्याअनिल सावंत यांच्या रूपाने तुतारीला तगडा उमेदवार मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला.

अनिल सावंत यांच्या रूपाने तुतारीला तगडा उमेदवार मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला.

मंगळवेढा/ प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधक ठरलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात तुतारीचा उमेदवार कोण असणार यावर उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर अगदी अंतिम टप्प्यात भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एबी फॉर्म मिळून तुतारीचे ते अधिकृत उमेदवार बनले आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अगदी सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला अनिल सावंत यांच्यासारखा तगडा उमेदवार मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पर्यायाने संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांचा उत्साह वाढल्याचे चिन्ह तयार झाले आहेत. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. तसेच महाविकास आघाडीतील मुख्य दोन घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह संचारला आहे. दोन्ही पक्षातील पदाधिकारी देखील अनिल सावंत यांच्या प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत.
निवडणुका जाहीर झाल्यापासून व तसेच त्याआधी दृष्टिक्षेपात असल्यापासून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके, भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत हे ज्यावेळी गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने गावोगावी गेले त्यावेळी लोकांनी व तसेच इच्छुक असलेल्या सर्व नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना तुतारी या चिन्हावर निवडणूक लढविण्याचे आवाहन केले होते. यानुसार सगळ्यांनीच प्रयत्न सुरू ठेवले होते. अनिल सावंत हे पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. फक्त इच्छुक न राहता त्यांनी प्रयत्नही सुरू ठेवले होते.
साम दाम दंड भेद अशा सर्वच बाजूने सक्षम असलेले व तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अनिल सावंत हे महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना तगडी टक्कर देऊ शकतात अशी सध्या चर्चा मतदारसंघात होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!