Homeराजकीयभोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरी प्रक्रियेत माझी महत्त्वाची भूमिका, भोसे जिल्हा परिषद...

भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरी प्रक्रियेत माझी महत्त्वाची भूमिका, भोसे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सिद्धेश्वर रणे यांची माहिती

भोसे / विशेष प्रतिनिधी : भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरी प्रक्रियेत आपण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती भोसे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार सिद्धेश्वर रणे यांनी दिली आहे. भोसे जिल्हा परिषद गटातील मतदारांनी मला मतदान का करावे, यामागचे खरे कारण आज प्रथमच सर्वांसमोर मांडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न
रणे म्हणाले की, तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. या योजनेला शासनस्तरावर मान्यता मिळवून देण्यात आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली, मात्र ही बाब आजपर्यंत आपण कधीही जाहीरपणे सांगितली नव्हती.
भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमुळे सुमारे ४० गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय उपलब्ध झाली आहे. ही योजना सुरळीत आणि दीर्घकाळ सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी शासनदरबारी प्रयत्न करावे लागतात. पण बरेच दिवस झाले ही योजना धुळखात पडली आहे. त्यासाठी सक्षम, अनुभवी आणि सातत्याने पाठपुरावा करणारा लोकप्रतिनिधी भोसे जिल्हा परिषद गटाला मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे रणे यांनी सांगितले.

उभारलेल्या उमेदवारांपैकी सर्वसामान्यांचे प्रश्नांसाठी योग्य पाठपुरावा करण्याची क्षमता फक्त माझ्याकडेच – सिद्धेश्वर रणे
या निवडणुकीत उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांपैकी ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याची क्षमता केवळ माझ्यात आहे, असा ठाम दावा त्यांनी केला. भोसे जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे योग्य पद्धतीने पाठपुरावा करून निधी आणि योजना आणण्याची ताकद आपल्याकडे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भोसे जि. प. गटात प्रश्नच शिल्लक ठेवणार नाही
यावेळी बोलताना रणे यांनी मतदारांना आवाहन केले की, एकदा संधी द्या, भोसे जिल्हा परिषद गटात कोणताही प्रश्न शिल्लक राहू देणार नाही. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भोसे जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी आपले अनुभव, संपर्क आणि कार्यक्षमता उपयोगी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!