मंगळवेढा / प्रतिनिधी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 साठी मंगळवेढा तालुक्यात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत धडाकेबाज उमेदवारांची घोषणा केली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारे, अनुभव व जनाधार असलेले उमेदवार देत काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे. लक्ष्मीदहिवडी जिल्हा परिषद गटातून कविता दत्तात्रय खडतरे, तर लक्ष्मी दहिवडी पंचायत समिती गणातून राजकुमार रामचंद्र मेतकुटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चोखामेळानगर पंचायत समिती गणातून रेश्मा माणिक गुंगे या महिला नेतृत्वावर पक्षाने विश्वास दाखवला आहे.
भोसे जिल्हा परिषद गटातून रविकिरण सुरेश कोळेकर, भोसे पंचायत समिती गणातून दामाजी बाबा सलगर, तर रड्डे पंचायत समिती गणातून प्रशांत पुंडलिक साळे काँग्रेसकडून रिंगणात उतरले आहेत. याशिवाय बोराळे पंचायत समिती गणातून शोभा राजेंद्र म्हमाने आणि हुलजंती पंचायत समिती गणातून अनिल कुमार विठ्ठलराव दुधाळ हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सर्व उमेदवार काँग्रेसच्या अधिकृत तिकिटावर मैदानात उतरले असून, तालुक्यात काँग्रेसच्या प्रचाराला वेग आला आहे. विकास, शेतकरी व ग्रामीण प्रश्नांवर लढा देत मंगळवेढ्यात सत्तांतर घडवण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे.























