Homeताज्या बातम्यानंदेश्वर गावचे सुपुत्र, हनुमान विद्यामंदिर मरवडेचे सहशिक्षक आप्पासाहेब दोलतडे विशेष शिष्यवृत्ती मार्गदर्शक...

नंदेश्वर गावचे सुपुत्र, हनुमान विद्यामंदिर मरवडेचे सहशिक्षक आप्पासाहेब दोलतडे विशेष शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक या पुरस्काराने सन्मानित

(टीम सोलापूर आजतक)
नंदेश्वर गावचे सुपुत्र, हनुमान विद्यामंदिर मरवडेचे सहशिक्षक आप्पासाहेब दोलतडे यांना सजग नागरिक संघ, मंगळवेढा व ॲग्रीक्रॉस एक्सपोर्ट प्रा.लि.पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सजग नागरिक संघ, मंगळवेढा व ॲग्रीक्रॉस एक्सपोर्ट प्रा.लि.पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवेढा तालुक्यातील सर्व प्राथमिक,माध्यमिक आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे गुरूंचा महागौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षक महागौरव सोहळा २०२५ हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते डॉ.संजय कळमकर, आ.समाधान आवताडे, माजी आ. दत्तात्रय सावंत, भैरवनाथ उद्योग समूहाचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, स्व.भारतनाना भालके फाउंडेशनचे अध्यक्ष सौ.प्रणिती भालके, धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन शोभा शिवाजीराव काळुंगे, सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा शिक्षण अधिकारी ज्ञानदेव जावीर, प्रगतशील द्राक्ष बागायतदार बाळासाहेब झांबरे पाटील व रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा चे माजी चेअरमन साहेबराव पवार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सामाजिक भान असणारे शिक्षक
हनुमान विद्यामंदिर मरवडेचे सहशिक्षक आप्पासाहेब दोलतडे हे जितके उत्कृष्ट शिक्षक आहेत तितकेच सामाजिक जीवनात देखील त्यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. नंदेश्वर व तसेच परिसरात होणार्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आपासाहेब दोलतडे हिरीरीने सहभाग नोंदवतात. याशिवाय शिष्यवृत्ती परीक्षेत त्यांनी आजपर्यंत अनेक विद्यार्थी चमकविले आहेत. दरवर्षी ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी स्वतः बुद्धिमत्ता परीक्षा घेतात. अशाप्रकारे एक सामाजिक भान असणारे शिक्षक म्हणून ते परिचित आहेत.

या सोहळ्यात उपस्थित सर्व गुरुजनांचा “मी सावित्री” पुस्तक, गुलाब पुष्प देऊन आदरपूर्वक गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० मंगळवेढा तालुक्यातील शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांचा विशेष सन्मान होणार आला. तसेच मंगळवेढा सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे शेतकरी आणि मार्गदर्शक यांना सजग ॲग्रीकॉस पुरस्कार देऊन शेतकऱ्यांमध्ये शिक्षक म्हणून मार्गदर्शन करणारे कृषी मार्गदर्शकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते व साहित्यिक आपले शिक्षक मित्र “डॉ. संजय कळमकर” यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. तसेच मंगळवेढातील पिकपद्धती मध्ये बदल करून आर्थिक समृद्धता आणण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

error: Content is protected !!