Homeताज्या बातम्यापंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ तुतारीकडेच राहणार - खा.धैर्यशील मोहिते-पाटील अनिल सावंत...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ तुतारीकडेच राहणार – खा.धैर्यशील मोहिते-पाटील अनिल सावंत यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी जाहीर

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी पक्षाकडे होता आणि भविष्यात राहील या यासंदर्भातील निर्णय हा खा. शरद पवार व महाविकास आघाडीचे मुख्य नेते घेतील असे प्रतिपादन खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनिल सावंत यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. अनिल सावंत यांच्या नामनिर्देशन पत्राला तुतारीचा एबी फॉर्म जोडण्यासाठी खा. धैर्यशील मोहिते-पाटील हे पंढरपूर येथे आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी पंढरपूर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल शहा, मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, पंढरपूर-मंगळवेढा कार्याध्यक्ष संतोष रंधवे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे संचालक पृथ्वीराज भैय्या सावंत, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख सुधीरभाऊ अभंगराव, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख महावीरनाना देशमुख, श्याम गोगाव, कृष्णदेव लोंढे, पंढरपूर शहर उपप्रमुख तानाजी मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अनिल सावंत यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आज त्यांनी अधिकृतरित्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ए.बी. फॉर्म घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
माध्यमांशी बोलताना अनिल सावंत म्हणाले, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ पारंपारिक पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे निश्चित या मतदार संघातून तुतारीचाच उमेदवार विजयी होईल. महाविकास आघाडीकडून एकच उमेदवार उभा राहील, इतरांना सांगण्या इतका मी मोठा नाही. महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते निश्चित योग्य तो निर्णय घेतील.

अनिल सावंत यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याने, पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
‌‌. गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, याविषयी कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रमात होती. त्यातच काँग्रेसने शरद पवारांना विचारात न घेता या मतदार संघातून भगीरथ भालके यांना उमेदवार जाहीर केली.
या मतदार संघाची जागा यापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे होती. त्यामुळे पारंपरिक या मतदार संघातून राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवेल, असं चित्र होतं. मात्र अचानक काँग्रेसने आपला उमेदवार दिल्याने, या मतदार संघात आणखीन पेच निर्माण झाला. आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने अनिल सावंतांना मैदानात उतरल्याने काँग्रेसपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!