Homeराजकीयप्रदीप खांडेकर यांच्या विजयात ' नंदेश्वर पॅटर्न ' ठरला निर्णायक

प्रदीप खांडेकर यांच्या विजयात ‘ नंदेश्वर पॅटर्न ‘ ठरला निर्णायक

नंदेश्वर/ प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधक आणि हायव्होल्टेज ठरलेल्या भोसे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत अखेर भाजपचे उमेदवार प्रदीप खांडेकर यांनी मोठे मताधिक्य मिळवित विजय मिळविला आहे. प्रदीप खांडेकर यांचा विजय हा आगामी राजकीय घडामोडींसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याच्या चर्चा सध्या मंगळवेढा तालुक्यात होत आहेत. प्रदीप खांडेकर यांच्या विजयात नंदेश्वर गावाचा सिंहाचा वाटा असल्याचे बाब निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

नंदेश्वर गावातून प्रदीप खांडेकर यांना तब्बल १२०० मतांचे मताधिक्य मिळाले आहे. आणि अगदी इतक्याच मतांनी प्रदीप खांडेकर यांचा विजय झाल्यामुळे या निवडणुकीत नंदेश्वर पॅटर्न निर्णायक ठरला असल्याचे स्पष्ट होत आहे. नंदेश्वर गावातील ज्या नेतेमंडळींच्या मधून विस्तव देखील जात नाही अशी सर्व नेतेमंडळी प्रदीप खांडेकर यांच्या प्रचारासाठी व विजयासाठी एकवटली. आणि नंदेश्वर गावातून खांडेकर यांना निर्णायक आघाडी देत खांडेकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

यामध्ये सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे भोसे गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अर्ज दाखल केलेले दादासाहेब दोलतडे यांनी घेतलेली माघार आणि फक्त माघार घेण्यावरच ते थांबले नाहीत तर प्रदीप खांडेकर यांच्या विजयासाठी जीवाचे रान करण्यात ते आघाडीवर होते. दादासाहेब दोलतडे यांनी माघार घेतल्यामुळे धनगर मतात होणारी विभागणी टळली. दुसरी महत्त्वाची घटना भोसे गटातून गतवेळी अगदी अल्पमतात पराभूत झालेले नामदेव जानकर यांनी सुरुवातीपासूनच प्रदीप खांडेकर यांच्या उमेदवारीवर विश्वास दर्शवून दिलेला भक्कम पाठिंबा ही होय.

तसेच शिवसेना माजी तालुकाप्रमुख अशोक चौंडे यांनी सर्वप्रथम प्रदीप खांडेकर यांना भोसे गटातून उमेदवारी द्यावी अशी आमदार आवताडे यांच्याकडे शिफारस करून त्यांच्या विजयासाठी मोठे प्रयत्न केले. माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांनीही चांगला पाठिंबा दिला. माऊली सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे यांनी मात्र प्रदीप खांडेकर यांच्या उमेदवारीपासून ते अगदी अखेरच्या टप्प्यापर्यंत अत्यंत नियोजनबद्ध यंत्रणा मार्गी लावली. दामाजी कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मण नरुटे यांनी केलेली अप्रत्यक्ष मदत देखील या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरली.

याव्यतिरिक्त सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी दोलतडे, माजी सरपंच अनिल गरंडे, उपसरपंच आनंदा पाटील, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आकाश डांगे, माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुलिंग दोलतडे, ग्रामपंचायत सदस्य पिंटू बंडगर, माजी उपसरपंच राहुल कसबे, युवक नेते जयसिंग कांबळे, ऊसतोड वाहतूक ठेकेदार संघटनेचे तालुकाध्यक्ष दामाजी बंडगर, मल्हार महासंघाचे तालुकाध्यक्ष अंकुश गरंडे, ग्रा.पं.सदस्य तानाजी मोटे, माजी ग्रा.पं. सदस्य मायाप्पा गरंडे, युवक नेते दत्ता साबणे, चांगदेव लवटे, सचिन गरंडे, मोहन कांबळे, तात्यासाहेब शिंदे यांचेसह अनेक ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी नंदेश्वर गावातच नव्हे तर भोसे गटातील जिथे जिथे शक्य आहे तिथे पोहोचून प्रयत्न केला. नंदेश्वर गावातील प्रमुख नेतेमंडळींनी अगदी सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे अत्यंत मनावर घेऊन प्रचार केला. याव्यतिरिक्त मनसेचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, अंकुशभाई गरंडे, ज्ञानु गरंडे, सुनिल बाळु गरंडे, तुकाराम गरंडे यांनी गटतट न पाहता खांडेकर यांना चांगली मदत केली.

नंदेश्वर गावातील मतदारांनी मात्र सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कारण ज्या ज्या वेळी गावातील प्रमुख नेते मंडळी एकत्रित येतात त्यावेळी नंदेश्वर गावातील मतदारांनी नेतेमंडळींच्या विरोधात मतदान केल्याचा या आधीचा तीन ते चार निवडणुकांचा अनुभव आहे. मात्र प्रदीप खांडेकर यांचा स्वभाव आणि सर्वसामान्य मिसळणारी त्यांची खासियत यामुळे नंदेश्वर गावातील सर्वच नागरिकांशी त्यांचा सलोखा होता. आणि नेमका हाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून नंदेश्वर येथील नागरिकांनी प्रदीप खांडेकर यांच्या पारड्यात मोठे मताधिक्य दिले आणि नंदेश्वर गावाने जितके मताधिक्य दिले अगदी तितक्याच मतांनी खांडेकर यांचा विजय झाला आहे. त्यामुळे प्रदीप खांडेकर यांच्या विजयात ‘नंदेश्वर पॅटर्न ‘ हा निर्णायक आणि महत्त्वपूर्ण ठरला असल्याची चर्चा मंगळवेढा तालुक्यात होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बापूसाहेब आडसूळ यांचा लोहार समाज संघटनेच्या वतीने सत्कार

सोलापूर / प्रतिनिधी : एकनाथ स्वाभिमानी शिक्षककर्मचारी पतसंस्थाच्या चेअरमनपदी बापूसाहेब आडसूळ यांची निवड झाल्याबद्दल लोहार समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. समाजातील...

नंदेश्वर येथे वनपरिक्षेत्रातील वनराईला भीषण आग; अनेक वृक्ष जळून खाक, सुस्त वनविभाग कधी जागा...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर येथील वनपरिक्षेत्रातील वनराईला गुरुवार दि. ४ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. पहाटेच्या वेळी...

सखाराम लोहार यांना महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (तंत्रज्ञ १) पदावर पदोन्नती, सर्व स्तरातून...

नंदेश्वर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मधील कर्मचारी तथा नंदेश्वर गावचे भूमिपुत्र सखाराम उर्फ दादासाहेब लोहार यांची तंत्रज्ञ १ या पदावर...

तोतया विद्यार्थी..नंदेश्वर येथे दहावीच्या परीक्षा केंद्रावर तोतया विद्यार्थ्यांचा मोठा पर्दाफाश; २० जणांवर गुन्हा, १०...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर (ता. मंगळवेढा) : येथील श्री बाळकृष्ण विद्यालय या दहावीच्या परीक्षा केंद्रावर मूळ विद्यार्थ्यांऐवजी तोतया विद्यार्थी बसवून परीक्षा देण्याचा गंभीर...

सलाम पत्रकारितेला…एपस्टीन फाइल् प्रकरण उघड करणाऱ्या ज्युली के. ब्राऊन यांची धाडसी पत्रकारिता

अमेरिकेतील अब्जाधीश वित्तीय दलाल जेफ्री एपस्टीन याच्याविरोधातील लैंगिक शोषण प्रकरणाला नव्याने उजाळा देण्याचे श्रेय तपास पत्रकार ज्युली के. ब्राऊन यांना दिले जाते. सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेखाली...

error: Content is protected !!