Homeराजकीयभोसे जिल्हा परिषद गटात विकासाची तुतारी वाजविण्यासाठीच मी रणांगणात उतरलोय, राष्ट्रवादी शरदचंद्र...

भोसे जिल्हा परिषद गटात विकासाची तुतारी वाजविण्यासाठीच मी रणांगणात उतरलोय, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सिद्धेश्वर रणे यांचे प्रतिपादन

भोसे / विशेष प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले मूलभूत प्रश्न सोडवून या भागात खऱ्या अर्थाने विकासाची तुतारी वाजविण्यासाठीच आपण निवडणुकीच्या रणांगणात उतरलो असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार सिद्धेश्वर रणे यांनी केले. भोसे जिल्हा परिषद गट हा मंगळवेढा तालुक्यातील एकमेव असा गट आहे, ज्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे. मात्र, एवढी महत्त्वाची पदे मिळूनही या गटातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, वीज, शेतीसाठी पाणी आदी अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिले आहेत, ही खंतही त्यांनी व्यक्त केली.

वर्षानुवर्षे सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित
रणे पुढे म्हणाले की, या गटामधून आतापर्यंत अनेक उमेदवार निवडून गेले. काहींनी जिल्हा परिषद गटाचे तर काहींनी वैयक्तिक स्वार्थाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जैसे थेच राहिले. खोटे आश्वासन देऊन जनतेला वेड्यात काढण्याची जी जुनी प्रथा आहे, ती आता मोडीत काढण्याची वेळ आली आहे. केवळ पदासाठी नाही तर भोसे गटातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठीच मी ही निवडणूक लढवत आहे, असे ठाम मत त्यांनी मांडले.

लोकप्रतिनिधी केवळ नावापुरता नसावा
भोसे गटातील शेती, पाणीटंचाई, तरुणांसाठी रोजगार, महिला व बचतगटांचे सक्षमीकरण, शाळा व आरोग्य केंद्रांची दुरवस्था या प्रश्नांवर ठोस आणि कालबद्ध उपाययोजना राबविण्याचा निर्धारही रणे यांनी यावेळी व्यक्त केला. लोकप्रतिनिधी हा केवळ नावापुरता नसावा, तर तो जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा असावा,असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या विचारधारेनुसार विकास, सामाजिक न्याय आणि पारदर्शक कारभार हेच आपल्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे असल्याचे सांगत, भोसे जिल्हा परिषद गटातील मतदारांनी परिवर्तनासाठी संधी द्यावी, असे आवाहनही सिद्धेश्वर रणे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगतची धोकादायक विहीर बुजविण्यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने बोलाविली विशेष ग्रामसभा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न...

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगत आणि नंदेश्वर गावाच्या हद्दीत असलेली धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याच्या मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसाय समाविष्ट करा, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप...

नंदेश्वर | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर धोरणात मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसायाचा समावेश करावा, अशी मागणी...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नंदेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्रलंबित प्रश्नांचे काय???

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

error: Content is protected !!