Homeताज्या बातम्यातुतारीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारात पत्नी शैलजाताई सावंत यांची आघाडी ...

तुतारीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारात पत्नी शैलजाताई सावंत यांची आघाडी मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागात शैलजाताई सावंत यांचा प्रचाराचा धडाका

नंदेश्वर /प्रतिनिधी
मंगळवेढा तालुका हा वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिला आहे. दुष्काळग्रस्त अशी ओळख असणाऱ्या मंगळवेढा तालुक्याला आजपर्यंत आश्वासनाशिवाय काही मिळाले. पण अनिल सावंत यांनी मात्र या भागाला मोकळी आश्वासने न देता भैरवनाथ शुगर च्या माध्यमातून एक मोठा साखर कारखाना सुरू करून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देत या साखर कारखान्यात अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे.

याशिवाय भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक लोकांना वैयक्तिकरित्या मदत केली आहे. अशाप्रकारे आभाळाएवढं काम असणारे अनिल सावंत हेच मंगळवेढा तालुक्याचा विकास करू शकतात असे प्रतिपादन तुतारीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या पत्नी शैलजाताई सावंत यांनी केले आहे. मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागात अनिल सावंत यांच्या प्रचारात त्या बोलत होत्या.

अनिल सावंत यांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी शैलजाताई सावंत यांनी मोठी आघाडी घेतली आहे. मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावात शैलजाताई सावंत यांनी घरोघरी जाऊन अनिल सावंत यांच्या तुतारी या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी सरपंच सरस्वती निकम, चंद्रप्रभा आप्पासाहेब माने त्यांचेसह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.
शैलजा सावंत यांच्या सोबत त्या त्या गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या त्यामुळे साध्या पद्धतीने सुरू केलेल्या प्रचार दौऱ्याला अक्षरशः रॅलीचे स्वरूप प्राप्त झाले. प्रचार दौऱ्यात असंख्य महिला सहभागी झालेल्या यावेळी दिसल्या.

*****************
विधानसभा निवडणूक सुरू होण्याआधी अनिल सावंत यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात महिलांना साड्यांचे वाटप देखील करण्यात आले होते. अनिल सावंत यांनी वाटप केलेल्या साड्या अत्यंत चांगल्या पद्धतीच्या होत्या अशी त्यावेळी महिलांमध्ये चर्चा रंगली होती. ज्या गावात प्रचार दौरा असेल त्या गावातील महिलांनी शैलजा सावंत यांना होम मिनिस्टर या कार्यक्रमाची आठवण करून देत यावेळी आम्ही अनिल सावंत यांना नक्की मतदान करणार आहोत अशी ग्वाही दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रेकिंग न्यूज… रक्षाबंधनासाठी मित्राच्या बहिणीला आणायला निघाला; परतीच्या वाटेवर काळाने हिरावला मित्राचा जीव; गोणेवाडीवर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी रक्षाबंधनाच्या सणासाठी बहिणीला माहेरी आणण्याचा आनंद घेऊन निघालेल्या भावाच्या वाट्याला नियतीने मात्र काळीज पिळवटून टाकणारे दुःख दिले. मित्राच्या बहिणीला घरी...

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

error: Content is protected !!