Homeताज्या बातम्यामंगळवेढ्यातील अल्पवयीन मुलीला अज्ञाताने केले सैराट.. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

मंगळवेढ्यातील अल्पवयीन मुलीला अज्ञाताने केले सैराट.. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

मंगळवेढा (प्रतिनिधी): मंगळवेढयाच्या ग्रामीण भागातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस मुंबई विरार पूर्व भागातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, यातील पिडीता ही मुळची मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातील असून त्यांचे कुटुंबीय हे व्यवसायानिमित्त राज्यभर फिरत असतात. मागील आठ महिन्यापासून ते कुटुंबीय मुंबई येथील विरार पूर्व भागात झोपडी मारून रहावयास होते.

दि.१२ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान पिडीत मुलीचे वडील व आई हे व्यवसायानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी पिडीता ही घरीच होती. आई वडील दुपारी १.३० वा. परत घरी आले त्यावेळी सदरची १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी दिसून आली नाही. तीचा आजूबाजूला सर्वत्र शोध घेवूनही ती मिळाली नसल्याने तीचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय मंगळवेढा तालुक्यातील मूळ गावी येवून शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे सदर कुटुंबियांना खात्री पटली की कोणीतरी अज्ञात इसमाने कोणते तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले असल्याचे पिडीतेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अधिक तपासासाठी तो मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, तीचे वर्णन पुढील प्रमाणे – रंग सावळा, बांधा मजबूत, उंची १५५ सेंमी, चेहरा उभट, केस काळे व लांब, नाक सरळ, अंगात लाल रंगाचा टॉप व निळ्या रंगाची पँट, लाल रंगाची ओढणी, शिक्षण सहावी, बोली भाषा मराठी अशा वर्णनाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

error: Content is protected !!