Homeताज्या बातम्यादारूच्या नशेत नंदेश्वर-भोसे येथील तरुण शेतकरी स्वतःच्याच विहिरीत पडून पडला मृत्युमुखी, चक्क...

दारूच्या नशेत नंदेश्वर-भोसे येथील तरुण शेतकरी स्वतःच्याच विहिरीत पडून पडला मृत्युमुखी, चक्क तीन दिवस पडून होता विहिरीत

नंदेश्वर /प्रतिनिधी
दारूच्या नशेत स्वतःच्याच विहिरीत पडून भोसे ता.मंगळवेढा येथील गणेश ज्ञानेश्वर व्हनमाने (वय ३५) हा तरुण शेतकरी मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची फिर्याद मयताचा भाऊ बिरू व्हनमाने यांने मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, मयताचा भाऊ बिरू व्हनमाने पुणे येथे कंपनीत नोकरीस आहे.व तो दि.२७ रोजी भोसे येथील आपल्या घरी गणपती बसविण्यासाठी मी गावी आलेलो होता. तो व त्याचा भाऊ गणेश ज्ञानेश्वर व्हनमाने भोसे ता. मंगळवेढा येथे एकत्रित राहणेस आहेत.

दि.२८ रोजी दुपारी दिड वाजता मयताचे वडील यांनी त्यांचा दुसरा मुलगा बिरू याला सांगितले की, त्यांचा मुलगा गणेश हा दि.२७ रोजी मोटार सायकल घेवून गेला आहे तो परत घरी आलेलाच नाही. त्यानंतर बिरु, त्याचे मित्र, नातेवाईक असे सर्वजण मिळून सगळीकडे शोधाशोध केली पण गणेश हा कोठेच मिळून आला नाही. शोधाशोध करत असताना दि.२८ रोजी रानातील एका दुधडेअरीतील कॉमेरा पाहीला असता त्या कॅमेरामध्ये गणेश हा त्याचे कडील असलेली मोटार सायकलवरती निघून गेला असल्याचे दिसले.

त्यानंतर सर्वांनी आजूबाजूस शोध घेतला यानंतरही मृत गणेश हा कोठेच मिळून आला नाही. त्यानंतर शुक्रवार दि.२९ रोजी सकाळी ११ वा. गणेश ज्ञानेश्वर व्हनमाने याचेकडे असलेली मोटार ही व्हनमाने यांच्याच शेतातील असलेल्या विहीरीच्या कडेला उभी असलेली दिसली. त्यावेळी त्या ठिकाणी विहीरीच्या कडेला एक चप्पलपण पडलेली होती. यानंतर सर्वांनी त्या विहीरीचे कडेला जावून पाहीले असता विहीरीचे पाण्यावरती गणेश ज्ञानेश्वर व्हनमाने याचे प्रेत पाण्यावरती तरंगत असल्याचे दिसले. मृत गणेश याला दारूचे व्यसन असल्यामुळे तो दारूच्या नशेत गाडी विहिरीच्या कडेला लावून विहिरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला. चक्क तीन दिवस तो विहिरीत पडून होता. यानंतर मृत गणेश याचा मृतदेह मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहे.

* दुर्दैवी योगायोग…..
सदर घटनेतील मृत गणेश व्हनमाने हा स्वतःच्या विहिरीत पडून मृत्युमुखी पडला. चक्क तीन दिवस विहिरीत पडून होता. दि. २७ रोजी तो त्याच्या मोटरसायकल वरती बसून घरातून निघून गेला होता. आणि चक्क तीन दिवसानंतर दिनांक २९ रोजी त्याचा मृतदेह स्वतःच्याच विहिरीत सापडला. सध्या पावसाचे दिवस चालू आहेत त्यामुळे शेतात पाणी देणेचा विषयच राहिला नाही. त्यामुळे त्यांच्या विहिरीकडे कोणीच गेले नाही. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या कुटुंबातील सदस्य मित्र नातेवाईक त्याला शोधत आहेत पण स्वतःचे विहिरीकडे ते गेले नाहीत हा दुर्दैवी योगायोग आहे अशी चर्चा होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!