Homeताज्या बातम्याबेकायदा मुरुम उपसा, वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची वन सचिव अन् जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बेकायदा मुरुम उपसा, वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची वन सचिव अन् जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

(टीम सोलापूर आजतक)
मेंढापूर (ता. पंढरपूर) येथील वनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदा मुरूम उत्खनन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये संबंधित वनविभागातील अधिकाऱ्यांचा हात असल्याची लेखी तक्रार वन्यजीव प्रेमी कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी मुख्य वन सचिव व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे. दरम्यान, वन क्षेत्रातील अशा वाढत्या घटनांमुळे वन्यजीव प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला आहे.

मेंढापूर, बाडर्डी येथे मोठे वनक्षेत्र आहे. येथील वनक्षेत्रामध्ये हरिण, काळवीट, कोल्हे, मोर, वनगायी यासह विविध वन्यजीव प्राण्यांचा अधिवास आहे. वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणावर अधिवास असताना देखील वन क्षेत्रातून हजारो ब्रास मुरमाचे बेकायदा उत्खनन करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून येथील वन क्षेत्रात बिनदिक्कतपणे हा प्रकार सुरू आहे.

वनविभाग किंवा महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता जेसीबी आणि टिपरच्या साह्याने मुरमाचे उत्खनन करण्यात आले आहे. उत्खनन केलेल्या मुरमाचा नेमका कुठे वापर केला, याचाही मागमूस लागला नाही. दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी वनक्षेत्रातून बेकायदा मुरूम उत्खनन टिपर वनविभागातील कर्मचाऱ्यांनी करून त्याची वाहतूक करणारे १२ पकडले होते. यावेळी त्यांनी आर्थिक तडजोड करून दहा टिपर सोडून दिले.

तर जुजबी कारवाईसाठी दोन टिपर पंढरपूर येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले होते. परंतु, संबंधित वाहनांवर किंवा त्यांच्या मालकांवर कोणतीही कारवाई न करता पदाचा गैरवापर करून ही वाहने सोडून देण्यात आल्याचा आरोपही श्री. चव्हाण यांनी लेखी निवेदनाद्वारे केला आहे. या प्रकरणी वन विभागातील संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी; अन्यथा येत्या २५ ऑगस्टपासून येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही श्री. चव्हाण यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतची अधिक माहिती घेण्यासाठी पंढरपूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल चाटे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

मेंढापूर येथील वन क्षेत्रातून मुरमाचे बेकायदा उत्खनन झाल्याची लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणी पंढरपूर येथील वन परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अवैध मुरूम उत्खनन झाल्याप्रकरणी जे कोणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल.
कुलराज सिंग, उपवन संरक्षक, सोलापूर विभाग

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!