Homeताज्या बातम्याभैरवनाथ शुगरच्या यंदाच्या गळीत हंगामात सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट...

भैरवनाथ शुगरच्या यंदाच्या गळीत हंगामात सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट – अनिल सावंत

लवंगी येथील भैरवनाथ शुगरच्या मिल रोलरचे पूजन
नंदेश्वर /प्रतिनिधी
येणार्‍या गाळप हंगामात कारखान्याने ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट ठेवले असून त्यानुसार ऊस नोंदीचे काम ही जवळपास पूर्ण केले आहे. ज्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या ऊसाची नोंद कारखान्याकडे देण्याची राहिली असेल त्यांनी शेती विभागाशी संपर्क साधून ऊस नोंदी द्याव्यात असे आवाहन भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत यांनी केले. भैरवनाथ शुगर वर्क्स लि.,यू-३ लवंगी या साखर कारखान्यामध्ये सन २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सावंत बोलत होते.

यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, सन २०२५-२६ च्या गळीत हंगामाची जय्यत तयारी चालू आहे. कारखान्यातील मशीनरीचे ऑफ सीझन मधील ओव्हर ऑयलिंगची व इतर दुरुस्तीचे सर्व कामे प्रगती पथावर चालू आहेत. तसेच ऊस तोडणी व वाहतूक करारही पूर्ण झाले असून त्यांची मागील वर्षाचे कमिशन व देय बिलाचे वाटप झाले आहे. त्याच बरोबर त्यांना येणार्‍या गाळप हंगामासाठी पहिल्या हप्त्याची उचलही दिलेली आहे.

यावेळी नितिन करपे व सौ.मनीषा करपे या उभयंताचे हस्ते धार्मिक विधी संपन्न झाला. यानंतर यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास कारखान्याचे जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, श्रीपती माने, तानाजी चव्हाण, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, एचआर मॅनेजर संजय राठोड, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण, शेतकी अधिकारी कृष्णदेव लोंढे, डे.चीफ केमिस्ट सिद्धेश्वर लवटे,चीफ अकौंटंट देवानंद पासले, केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील, ई.डी.पी मॅनेजर गजानन माने-देशमुख, स्टोअर किपर केदार साबणे, सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे, कार्यालय अधीक्षक अभिजीत पवार तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी परिसरातील शेतकरी व ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!