Homeताज्या बातम्यामोठी बातमी! स्फोटक रसायनाचा टँकर मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर झाला पलटी; सोलापूरकडे जाणारी वाहतूक...

मोठी बातमी! स्फोटक रसायनाचा टँकर मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर झाला पलटी; सोलापूरकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली; आता वाहतूक सुरळीत सुरू

(टीम सोलापूर आजतक)
मंगळवेढा ते सोलापूर या महामार्गावर हॉटेल सुगरण च्या जवळ इथाईल ऍसिटेट या रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाच्या झोपेच्या भरात दुभाजकाला धडकून टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.महामार्गावर वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्याने पोलिसांनी सध्या वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली होती मात्र आता वाहतूक सुरळीत सुरू झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

घटनास्थळी मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिरिगिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, तहसीलदार मदन जाधव व इतर स्टाफ, क्रेन ऑपरेटर रेवणसिद्ध लवटे, लक्ष्मण लवटे, नागेश वाघमोडे, NHAI CRO मदन शिरसागर, ASST मॅनेजर अनुराग समर्थ व स्टॉप,फायर ब्रिगेड संभाजी कारले अग्निशमन अधिकारी पंढरपूर व STAFF, पंढरपूर नगरपरिषद फायर ब्रिगेड स्टाफ , मंगळवेढा नगरपरिषद फायर ब्रिगेड वाहन व स्टाफ, सोलापूर मनपा फायर ब्रिगेड अधिकारी रावसाहेब सलगर व स्टाफ आदीजन उपस्थित होते.

अपघातस्थळी मंगळवेढा, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणातील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित केली असून सकाळी 7.30 वा दरम्यान टँकर AP-31VC 8227 क्रमांकाचा टँकर इथाईल ऍसिटेट हे रसायन आंध्र प्रदेशात जात होता.
टँकर चालकाला झोप लागल्यामुळे झोपेच्या भरात सदरचा रासायन वाहून करणारा टँकर डिव्हायडरला धडकला. टँकर मधील रसायन हा ज्वलनशील असल्यामुळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सदर वाहतूक तात्काळ बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.मात्र पर्यायी मार्ग लांबच असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळे पोलिसांनी थोड्या प्रमाणात वाहने सोडण्यास सुरुवात केली घटनास्थळी पंढरपूर मंगळवेढा सोलापूर या ठिकाणची अग्निशामक यंत्रणा प्रचारण करण्यात आली.

पलटी झालेल्या टँकर अद्याप उचलण्यात आला नसल्यामुळे वाहनाची गर्दी लक्षात घेता सध्या वाहतूक एकरी ठेवली टँकर उचलण्याच्या दरम्यान ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
सध्या पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगड्डे, तहसीलदार मदन जाधव यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या महामार्गावर ठाण मांडून आहे.
राष्ट्रीय महामार्गावर टँकर पलटी झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून सदर रसायन ज्वलनशील आहे यापासून दूर व्हावे व पर्यायी मार्गाने प्रवास करावा असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग ,पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

*************
स्फोटक रसायनाचा टँकर पलटी
स्फोटक रसायनाचा टँकर पलटी झाल्यामुळे वाहनाने पर्यायी मार्गाने वळविली. रसायन बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू असून टँकर उचलण्याच्या दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून वाहनधारकाने पर्याय मार्गाचा अवलंब करावा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाच्या पाहणी नंतर रस्ता खुला करण्यात आला.-दत्तात्रय बोरीगीड्डे, पोलीस निरीक्षक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कौतुकास्पद…प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने मसनेरवस्ती शाळेत स्पोर्ट्स किटचे वाटप, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून...

नंदेश्वर / प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसनेरवस्ती येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. प्रेरणा स्पोर्ट गारमेंटचे...

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

error: Content is protected !!