Homeताज्या बातम्यामी कुस्ती धरली की निकालीच काढतो...आ. समाधान आवताडे यांचे प्रतिपादन.. नंदेश्वर येथे...

मी कुस्ती धरली की निकालीच काढतो…आ. समाधान आवताडे यांचे प्रतिपादन.. नंदेश्वर येथे श्री मलुआई देवी यात्रेनिमित्त आयोजित कुस्तीच्या फडाचे आमदार आवताडे यांच्या उद्घाटन..

नंदेश्वर/ प्रतिनिधी
कुस्ती हा माझा बालवयापासूनचा आवडता खेळ आहे. फक्त आवडता खेळच नाही तर मी एकेकाळी कुस्तीतला चॅम्पियन राहिलो आहे. त्यामुळे मी एकदा कुस्ती धरली की ती निकालीच काढतो मग ती कुस्ती कुस्तीच्या फडातली असो अथवा कोणतीही अशी मिस्कील टिप्पणी आमदार समाधान आवताडे यांनी केली. नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथे श्री मलुआई देवी यात्रेनिमित्त कुस्तीच्या फडाचे आयोजन करण्यात आले होते.

या कुस्तीच्या फडाचे उद्घाटन आ.आवताडे यांच्या हस्ते केले यावेळी आमदार आवताडे बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मारुती वाकडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू बाबर, माजी उपसभापती दादासाहेब गरंडे, दामाजीचे संचालक भिवा दोलतडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे, माजी उपसभापती सूर्यकांत ढोणे, माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे, धनश्री मल्टीस्टेटचे संचालक रामभाऊ बंडगर,यात्रा कमिटीचे अध्यक्ष दादासाहेब चौगुले, व्यवस्थापक नानासाहेब बंडगर, माजी उपसरपंच राहुल कसबे, युवक नेते जयसिंग कांबळे, आकाश डांगे, दत्ता साबणे, आबासाहेब पाटील हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ.आवताडे म्हणाले की, एक रुपयांचीही लोकवर्गणी न घेता इतके दर्जेदार, महागडे आणि समाजातील सर्वच स्तरातील लोकांचा विचार करत केलेले कार्यक्रम आणि अत्यंत संघटनात्मक भरवलेली जत्रा यामुळे नंदेश्वर येथील श्री मलुआई देवी यात्रा कमिटी आणि यात्रेचे संयोजक शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे यांनी अन्य यात्रा कमिट्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. तसेच मी मंगळवेढा तालुक्यातील व तसेच मतदार संघातील अनेक कुस्ती आखाड्यांना भरघोस निधी मिळवून दिला आहे. नंदेश्वर येथे कुस्ती आखाडा तयार करा या आखाड्याला लागेल तितका निधी मी उपलब्ध करून देतो असेही यावेळी बोलताना आमदार आवताडे म्हणाले.

यावेळी बोलताना अशोक चौंडे म्हणाले की, नंदेश्वर येथे मलुआई यात्रेचे गेल्या बारा वर्षापासून आम्ही नियोजन करीत आहोत. यात्रा कमिटीने या यात्रेचे सर्वाधिकार माझ्याकडे अगदी डोळे झाकुन दिले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून एक रुपयांचीही वर्गण न घेता इतके दर्जेदार कार्यक्रम आम्ही करीत आहोत हे माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचे उदाहरण आहे. यापुढेही वर्गणी न घेता यात्रा आम्ही चांगल्या पद्धतीने करणार आहोत.

नंदेश्वर येथे आयोजित कुस्तीच्या मैदानात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मल्ल मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. कुस्त्यांचा फड अत्यंत नियोजनबद्ध आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा असा पार पडला अशा प्रतिक्रिया सहभागी झालेल्या मल्लांनी व प्रेक्षकांनी दिल्या.

यावेळी युवक नेते वसंत गरंडे, लक्ष्मण गरंडे, बबन पाटील, श्री बाळकृष्ण माऊली सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुलिंग दोलतडे, माजी उपसरपंच अंकुश कांबळे, माऊली पतसंस्थेचे चेअरमन आण्णासाहेब बंडगर, गुरुमाऊली पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव मोटे, कार्याध्यक्ष पोपट बंडगर, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सोन्या घोड्याचे मालक लक्ष्मण घोडेवाले, सुधीर गरंडे,पृथ्वीराज चौंडे, मुकुंद व्हरगळ, तानाजी खुळे, दत्ता पाटील, माणिक पाटील, शिवसेना शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष दिगंबर गरंडे, भारत लाड, सतीश क्षीरसागर, युवराज बंडगर, प्रवीण पाटील, दगडू क्षीरसागर, सुखदेव शिंदे, किसन कांबळे,संजय जोरवर, संजय कोडगीर, देवाप्पा पाटील, बापू जोरवर, शिवाजी खुळे, बालाजी चौंडे, शिवशंकर चौंडे, शिवाजी चौंडे, हणमंत पाटील, भीमराव पाटील, पांडुरंग चौंडे, दामू चौंडे, शिवाजी विठ्ठल चौंडे, अंबादास व्हरगळ, दिलीप चौगुले, रामदास चौंडे, समाधान चौंडे, विष्णू बेलदार, अमोल बेलदार, महादेव चौगुले, सतीश लेंडवे, औदुंबर कुंभार, सोमनाथ चौगुले, सागर बजरंग कांबळे, मल्हारी कांबळे, तानाजी कांबळे, अनिल लवटे, अंबादास लवटे, भारत कळकुंबे, ज्ञानेश्वर कळकुंबे, अंबादास शिंदे, नवनाथ मेटकरी, हरी कसबे, ज्ञानेश्वर गरंडे,आण्णा कुंभार, दत्ता बंडगर, भागवत मेटकरी, सोन्या बंडगर, हनुमंत माळी, बाळासाहेब लोहार, बाळासाहेब माळी हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!