
(टीम सोलापूर आजतक)
नंदेश्वर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नंदेश्वर गावचे सुपुत्र, माजी सैनिक लक्ष्मण मासाळ यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ज्यांनी देशाची सेवा केली आहे अशा माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण केल्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ध्वजारोहणानंतर सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांच्या समोर कवायत प्रकार करून दाखवले. यानंतर अनेक विद्यार्थ्यांची भाषणे संपन्न झाली. मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. शेवटी खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यावेळी सरपंच सजाबाई गरंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब सासणे, माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी मोटे, ग्रामपंचायत सदस्या राजश्री कांबळे,पोलीस पाटील संजय गरंडे, उपाध्यक्ष पोपट बंडगर, माजी अध्यक्ष दामाजी सलगर, मुख्याध्यापक प्रदीप पाटील, युवक नेते रशीद कांबळे,

सहशिक्षक अशोक मासाळ, बाळासाहेब मासाळ, सुशीला सलगर, दादासाहेब इंगोले, सचिन लाळे, बाळासाहेब मोरे, सुसेन क्षीरसागर, पाराप्पा पाटील, सुनील मेटकरी, सदस्य सुनील कसबे, प्रताप परीट, बाबुराव जोरवर हे उपस्थित होते.




















