Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद, पंचायत समिती : आरक्षण नियमावली प्रसिद्ध गट, गण आरक्षणासाठी चक्रानुक्रम...

जिल्हा परिषद, पंचायत समिती : आरक्षण नियमावली प्रसिद्ध गट, गण आरक्षणासाठी चक्रानुक्रम…

(टीम सोलापूर आजतक)
जिल्हा परिषद, पंचायत समिती : आरक्षण नियमावली प्रसिद्ध
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडतीसाठी चक्रानुक्रम पद्धत वापरली जाते. आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम निश्चित करण्यासाठी ग्रामविकास विभागाने नवीन नियम तयार केले आहेत. या नियमांचे राजपत्र २० ऑगस्टला प्रसिद्ध झाले आहे. येत्या काळात घेण्यात येणारी जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक ही या नव्या नियमानुसार जागांच्या चक्रानुक्रमासाठी पहिली निवडणूक समजली जाणार आहे.
ग्रामविकास विभागाच्या राजपत्रामुळे गट, गणाच्या एससी व ओबीसी आरक्षणाची सुरवात पहिल्यापासून होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची अंतिम गट/ गण रचना आज प्रसिद्ध झाली. ही प्रभागरचना अंतिम होण्यापूर्वीच ग्रामविकास विभागाने चक्रानुक्रमाची नवी नियमावली आणली आहे. या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती /जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला आरक्षण कसे काढावे, याचे नियम सांगितले आहेत. सोडतीची नियमावली प्रसिद्ध झाली आहे.

प्रत्यक्ष आरक्षण सोडत कधी निघणार, याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत गट व गणांसाठी प्रत्यक्ष आरक्षण सोडत काढली जाईल, सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होईल, अशी दाट शक्यता व्यक्त होत आहे.

* १९९६ ची नियमावली झाली रद्द *
महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम १९९६ चा वापर केला जात होता. आरक्षणासाठी शासनाने नवी नियमावली करताना १९९६ ची ही नियमावली रद्द केली आहे. तब्बल ३० वर्षांनंतर आरक्षणासाठी नवी नियमावली आल्याने या प्रक्रियेत आणि जुन्या प्रक्रियेत नक्की काय बदल केले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

* २०१७ मधील गटांच्या आरक्षणाची स्थिती *
१) अनुसूचित जमाती (१): गोपाळपूर (ता. पंढरपूर)

२) अनुसूचित जाती (१०) : केम, पेनूर, वेळापूर, वळसंग. महिला : नातेपुते, जवळा, कडलास, हुलजंती, बोरामणी

३) सर्वसाधारण महिला (२०) : पांडे, वीट, कोर्टी, भोसरे, उपळाई बु., बेंबळे, पानगाव, दारफळ बीबी, कुरुल, करकंब, दहिगाव, मांडवे, संग्रामनगर, अकलूज, बोरगाव, निमगाव, मंद्रूप, चपळगाव, नागणसूर, सलगर

४) नागरिकांचा मागास प्रवर्ग (१८) : उपळे दुमाला, मालवंडी, कामती बु., रोपळे, म्हाळुंग, पिलीव, घेरडी, कुंभारी, वागदरी. महिला : टेंभुर्णी, पांगरी, वैराग, वाखरी, भाळवणी, टाकळी, यशवंतनगर, लक्ष्मी दहिवडी, भंडारकवठे.

५) सर्वसाधारण (१९): वांगी, मानेगाव, कुई, मोडनिंब, उपळाई ठोंगे, नान्त्रज, आष्टी, अनगर, नरखेड, कासेगाव, महूद बु., एखतपूर, नाझरे, कोळा, संत दामाजीनगर, भोसे, हत्तूर, जेऊर, मंगरूळ.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

error: Content is protected !!