Homeताज्या बातम्यामंगळवेढ्यात महिला हॉस्पिटलच्या विरोधात अन्नत्याग आंदोलन, अवाच्यासव्वा बिल आकारणी, इनामी कब्रस्तानच्या जागेवर...

मंगळवेढ्यात महिला हॉस्पिटलच्या विरोधात अन्नत्याग आंदोलन, अवाच्यासव्वा बिल आकारणी, इनामी कब्रस्तानच्या जागेवर अतिक्रमण यासह अनेक आरोप, तब्बल सहा दिवसानंतर कारवाईच्या आश्वासनाने आंदोलन मागे…

(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
मंगळवेढा शहरातील महिला हॉस्पिटलच्या विरोधात अवाच्यासव्वा बिल आकारणी, इनामी कब्रस्तानच्या जागेवर अतिक्रमण यासह अनेक आरोप करत नारायण गोवे यांनी तब्बल सहा दिवस पडत्या पावसात सुरू ठेवलेले अन्नत्याग आंदोलन कारवाईच्या आश्वासनाने आंदोलन मागे घेतले आहे. यामध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे आणि मंगळवेढा तालुकाध्यक्ष धनाजी गडदे यांनी यशस्वी मध्यस्थी केली.
दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रूग्णालय, मंगळवेढा यांचे कार्यालयासमोर म.न.से. जिल्हा बापू समन्वयक नारायण गोवे हे महिला हॉस्पिटलच्या विरोधात अन्नत्याग उपोषणास पडत्या पावसात तब्बल सहा दिवस बसले होते. दरम्यान वैद्यकिय अधिक्षक डॉ. सुलोचना जानकर यांनी दि.२० रोजी कारवाईचे लेखी पत्र दिल्याने तूर्त हे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे गोवे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

डॉ. नंदकुमार शिंदे यांचे बोराळे नाका येथे जय महिला हॉस्पीटल असून हॉस्पिटलचे नूतनीकरण दि.३१/३/२०२५ रोजी काही त्रुटीमुळे झालेले नव्हते. तरीसुद्धा महिला हॉस्पिटल राजरोसपणे चालू होते. तेव्हा गोवे यांनी आरोग्यमंत्री, बॉम्बे नर्सिंग असोसिएशन, जिल्हा शल्य चिकित्सक. सोलापूर, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा, मंगळवेढा पोलिस स्टेशन, मुख्याधिकारी नगरपालिका सर्वांना कळवून सुद्धा हॉस्पिटल सील केलेले नाही. हॉस्पिटलने अतिक्रमण करून शेजारी हॉटेल, मेडिकल दु‌कान, दोन गाळे भाडयाने देणे ही जागा देवस्थान ईनामी कबरस्थानची असून सुद्धा नगरपालिकेने बांधकाम परवाना कसा काय दिला? ही जागा कुठे वर्ग केली? गरोदर महिलांची डिलेव्हरीचे बील ६० ते ७० हजार रूपये घेवून गोरगरीबांवर अन्याय केला जातो. दि.९/७/२०२५ ला नूतनीकरण केले तेव्हा महिला हॉस्पिटलचे नाव मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असे केले आहे. तसे ३ महिने ८ दिवस महिला हॉस्पिटल अनाधिकृतपणे सुरू होते. गोवे यांनी सर्व शासकीय ऑफिसला कळवून सुद्धा हॉस्पिटल सिल केले नाही तसेच गुन्हाही दाखल केलेला नाही, दंडही केलेला नाही. म्हणून नारायण गोवे अन्नत्याग उपोषणास ६ दिवस बसल्यावर दि.२०/८/२०२५ रोजी दुपारी १२ वाजता म.न.से. नेते मा.दिलीप धोत्रे येवून वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस.एल. जानकर यांना उपोषणाच्या ठिकाणी बोलावून त्यांच्याकडून योग्य कारवाई करण्यात येईल असे पत्र घेण्यात आले व उपोषणास स्थगिती देण्यात आली. यावेळी दिलीप धोत्रे व डॉ.सौ.एस.एल. जानकर यांनी लेखी आश्वासन दिल्यावर अन्नत्याग उपोषण सोडण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पवार, पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील, मंगळवेढा तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, पिंपळकर गणेशराव, शहर उपाध्यक्ष राहुल पांढरे, श्रीकांत पवार, श्रीकांत जाधव, अमोल पवार, कृष्णा ओमने, अमर खंदारे, तालुका उपाध्यक्ष रवि कांबळे, बालाजी भोजने, उ.बा.ठा. जिल्हा उपाध्यक्ष क्रांती दत्तू, शहराध्यक्ष बापू खराडे, डी. के. साखरे, येताळा खरबडे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

error: Content is protected !!