Homeताज्या बातम्या'मैं डीसीएम अजित पवार बोल रहा हु... कारवाई बंद करो, मेरा आदेश...

‘मैं डीसीएम अजित पवार बोल रहा हु… कारवाई बंद करो, मेरा आदेश है’ ….बेकायदा मुरूम उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस उपअधीक्षकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखले…

(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
बेकायदा मुरूम उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस उपाधीक्षकांना ‘मैं डीसीएम अजित पवार बोल रहा हु. कारवाई बंद करो, मेरा आदेश है’म्हणत कारवाई बंद करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिले. आणि त्यांचा फोन नंबर घेऊन मी तुम्हाला वैयक्तिक बोलतो असे म्हणाले.
माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या करमाळा विभागाच्या पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोन संभाषण व व्हिडीओ कॉल प्रकरण सध्या प्रसार माध्यमात जोरदार चर्चेत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुर्डू गावात रस्त्यासाठी सुरू असलेल्या मुरूम उत्खननाच्या तक्रारीनंतर पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी स्थानिक ग्रामस्थांसोबत त्यांची शाब्दिक चकमक झाली. या दरम्यान बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून कृष्णा यांच्या हातात दिला. फोनवरून पवारांनी स्वतःची ओळख करून देत कारवाई थांबविण्याचे आदेश दिले. मात्र, अंजली कृष्णा यांनी त्यांचा आवाज ओळखला नाही. त्यावर पवारांनी नाराजी व्यक्त करत ‘मैं डीसीएम अजित पवार बोल रहा हु. कारवाई बंद करो, मेरा आदेश है’ असे सांगितले.

बेकायदा मुरूम उपसा करणाऱ्यांवर व पोलिसांशी वाद घालणाऱ्या गुंडांवर गुन्हा दाखल करा – अतुल खूपसे-पाटील
दरम्यान शेतकरी नेते अतुल खूपसे-पाटील यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकत राज्याचे मुख्य असणारे अवैध धंद्यांना पाठीशी घालत आहेत असा आरोप केला. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी ज्या अजित पवारांना पालकमंत्री केले आहे ते अजित पवार बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी तर रोखू शकले नाहीत मात्र ते सोलापूर जिल्ह्याचा बीड करत आहेत असा आरोप केला. तसेच सदर प्रकरणातील ज्यांनी बेकायदा मुरुप उपसा केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. तसेच त्यांनी बेकायदा मुरूम उपसा रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांना दमबाजी करत त्यांच्याशी वाद घातला आहे अशा सर्वांवर येत्या आठ दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

error: Content is protected !!