Homeताज्या बातम्याअखेर माढ्याचा तिढा सुटला... राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा विधानसभा मतदारसंघात अभिजीत...

अखेर माढ्याचा तिढा सुटला… राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा विधानसभा मतदारसंघात अभिजीत पाटील यांना उमेदवारी…

टीम सोलापूर आजतक…
गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यासंदर्भात मोठा घोळ निर्माण झाला होता. यामध्ये विद्यमान आमदार बबनदादा शिंदे, भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, माढा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मीनल साठे यांचे सह अजून काही उमेदवार इच्छुक होते. पण अखेर खा. शरद पवार यांनी त्यांचे निकटवर्तीय असणारे व माझी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या खास मर्जीतील अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी दिली आहे.
अभिजीत पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. अगदी झपाटल्यासारखे विविध कार्यक्रम घेत पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. आणि याचीच पोचपावती म्हणून शरद पवार यांनी अभिजीत पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे. तसेच पंढरपूर तालुक्यातील जवळपास 42 गावांचा माढा विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. यामध्ये बहुतांश विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावे येतात. आणि जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात अभिजीत पाटील यांनी विठ्ठल कारखान्याला दिलेला उसाचा दर चर्चेत आहे. अभिजीत पाटील यांच्या दर्जाहीर करण्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे आणि ही बाब आगामी विधानसभा निवडणुकीच्या फायदेशीर ठरणार असल्याची चर्चा माढा विधानसभा मतदारसंघात होत आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. यामुळे अभिजीत पाटील यांच्या समर्थकांमध्ये जल्लोष होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!