Homeताज्या बातम्याधक्कादायक....मंगळवेढा तहसील कार्यालयात नंदेश्वर येथील युवक शेतकऱ्याचा व्हाट्सअपला स्टेटस ठेवत आत्महत्येचा प्रयत्न,तहसीलमधील...

धक्कादायक….मंगळवेढा तहसील कार्यालयात नंदेश्वर येथील युवक शेतकऱ्याचा व्हाट्सअपला स्टेटस ठेवत आत्महत्येचा प्रयत्न,तहसीलमधील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
जमिनीची नोंद धरण्यावरून महसूल यंत्रणेकडून झालेल्या त्रासाला वैतागून नंदेश्वरच्या समाधान मोटे या युवक शेतकऱ्याने तलाठी व मंडल अधिकाऱ्याचे नाव व्हाट्सअप स्टेटसला ठेवत मंगळवेढ्यातील तहसील कार्यालयात अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने महसूलच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली.याबाबत सविस्तर हकीकत अशी, नंदेश्वर मधील समाधान मोटे या शेतकऱ्याच्या खरेदीची नोंद महसूल यंत्रणांकडून रद्द करण्यात आली. ज्या कारणास्तव रद्द करण्यात आले. त्यातील दुरुस्ती शेतकऱ्याने करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या संदर्भातील नोंद घेण्यास तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यावरून संबंधित शेतकऱ्याने आज दु. 3 दरम्यान मंगळवेढा तहसील कार्यालयात अंगावर तेल ओतून पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, महसूल मधल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही दुर्दैवी घटना टळली.

महसूल मंडल अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीसाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. कोणत्याही कारणास्तव नोंद करत असताना काहीतरी कारण सांगून नोंद प्रलंबित ठेवणे आणि त्यांच्या नेमलेल्या झिरो हस्तकामार्फत अर्थपूर्ण व्यवहार झाल्यानंतर ती नोंद प्रमाणित करण्याचे प्रकार सुरू आहेत.
परंतु याकडे महसूच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोयीस्करित्या दुर्लक्ष केल्यामुळे यापूर्वी दोन वेळा मंडळ अधिकाऱ्याला लाच प्रकरणात अटक झाली आहे. तरी देखील महसूल यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहत नाही आज शेवटी संतप्त झालेल्या शेतकऱ्याने आपल्या त्रासाला तलाठी व मंडल अधिकारी जबाबदार असून आपण त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा व्हाट्सअप स्टेटस ठेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आजच्या घटनेनंतर यामध्ये दोषी कोण आहेत याबाबत प्रांत अधिकारी तहसीलदार यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी या निमित्ताने पुढे येत आहे.

प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देण्यास कटीबद्ध – खासदार प्रणिती शिंदे
दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी नंदेश्वरचे शेतकरी समाधान मोटे यांच्याशी फोनवरून संवाद साधत तुमचा जो प्रश्न आहे तो आपण कायदेशीर मार्गाने मार्गी लावू. तुम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नका मी लवकरात लवकर तुमची भेट घेते. आणि संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना या प्रकरणा संदर्भात जाब विचारून तुम्हाला न्याय मिळवून देते असा शब्द दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नंदेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्रलंबित प्रश्नांचे काय???

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!