Homeताज्या बातम्यामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिलीपबापू धोत्रे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढ्यात 6...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिलीपबापू धोत्रे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढ्यात 6 नोव्हेंबर रोजी धडाडणार तोफ

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी मंगळवेढा येणार असून त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यानी प्रचारात आघाडी घेतली असून महाराष्ट्रात सर्वात अगोदर त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या प्रचारार्थ सायंकाळी सहा वाजता मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौक येथील आठवडा बाजार येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पंढरपूर मध्ये अनेक वर्षापासून एमआयडीसीचा प्रश्न प्रलंबित आहे. या ठिकाणी राज ठाकरें च्या माध्यमातून देशातील मोठे उद्योगपती यांच्यामार्फत उद्योग उभारून तरुण-तरुणींच्या हाताला काम देण्याचे काम करणार आहे. मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचा भव्य असा पुतळा उभारण्यासाठी अभिवचन देत आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माजी उमेदवारी असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गेले दीड महिना त्यांनी प्रचाराचा धडाका चालवला असून आणि पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावे पिंजून काढत असून त्यांच्या सभांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक गावातील सभांना त्यांच्या प्रचंड गर्दी होत असून विविध पक्षाचे, गटाचे कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघातील वातावरण मनसेमय झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व प्रश्न मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे जनतेसमोर मांडत असून जनता ही त्यांच्या अडचणी वर चर्चा करत आहे.मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचारास सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यातच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवाराची सभा घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या व्हिजन कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहा नोव्हेंबर रोजी मंगळवेढा येथे येत असून राज ठाकरे यांच्या सभेची जनतेत चर्चा सुरू झाली आहे. यासभेला हजारोची संख्येने नागरिक उपस्थित राहीतील अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!