Homeताज्या बातम्यापंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाला महाराष्ट्रात विकासाचा मॉडेल बनवून दाखवतो - अनिल सावंत...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाला महाराष्ट्रात विकासाचा मॉडेल बनवून दाखवतो – अनिल सावंत *मंगळवेढा येथील महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचार सांगता सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नंदेश्वर (प्रतिनिधी) खोटे-नाटे बोलून लोकांना फसविणे हे माझ्या स्वभावात बसत नाही. मी आजपर्यंत सर्वसामान्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. अगदी पदरमोड करून मी माझ्या पद्धतीने प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी अशाच प्रकारे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून जर मला विधानसभेत जायची संधी दिली तर या मतदारसंघाला मी महाराष्ट्रात विकासाचा मॉडेल बनवून दाखवतो असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि सावंत यांनी केले. मंगळवेढा येथील सांगता प्रचार सभेत सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे राष्ट्रवादीचे नेते राहुल शहा, चंद्रशेखर कोंडूभैरी, संतोष रंधवे, शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय भोसले, काँग्रेसचे फिरोज मुलाणी, माजी उपनगराध्यक्ष मुजफर काझी, माजी नगरसेवक चंद्रशेखर कोंडूभैरी, कार्याध्यक्ष संतोष रंधवे, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य साहेबराव पवार, जेष्ठ नेते दादासाहेब गरंडे, राजाभाऊ चेळेकर, महिला नेत्या संगीता कट्टे, मरवडेचे माजी सरपंच दादासाहेब पवार यांचेसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे विविध पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार सभा सुरू होण्याआधी मंगळवेढा शहरातून काढलेल्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, आजपर्यंत या मतदारसंघाला अनेक लोकप्रतिनिधी लाभले आहेत. पण दोन्ही तालुक्यात म्हणावा तसा विकास आज हे नागरिकांना बघायला मिळत नाही. अगदी गेल्या 20-30 वर्षापासून लोकांचे जे प्रश्न होते आजही ते तसेच रखडले आहेत. माझी काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. मी एखादा विषय हातात घेतल्यानंतर तो विषय जोपर्यंत मार्गे लागत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा सोडत नाही. त्यामुळे मतदारांनी एक वेळ मला संधी द्यावी असेही आवाहन यावेळी सावंत यांनी बोलताना केले.

चौकट
मंगळवेढा येथील श्री संत दामाजी कारखान्याच्या निवडणुकीपासून चर्चेत असलेले समविचारी आघाडीचे निमंत्रक आणि मंगळवेढा येथील बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख यांनी अनिल सावंत यांना पाठिंबा दिला. याशिवाय शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमोगसिद्ध काकणकी यांनीही सावंत यांना पाठिंबा दिला. शेतकऱ्यांविषयी एक तळमळ असलेला नेता म्हणून आम्ही अनिल सावंत यांना पाठिंबा देत असल्याचे दामोदर देशमुख आणि अमोगसिद्ध काकणकी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पंढरपूरच्या सांस्कृतिक वारशासोबत औद्योगिक विकासाचीही गरज; शिवसेना नेते अनिल सावंत यांची उद्योगमंत्री ना. उदय...

पंढरपूर / प्रतिनिधी : आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या पंढरपूर शहराला आता मराठी भाषा संवर्धनासोबतच औद्योगिक विकासाचीही जोड मिळावी, अशी मागणी पुढे येऊ...

यशाच्या शिखरावर असताना इतके टोकाचे पाऊल का उचलले?पोलिसांकडून रिलस्टार रोहिणी पाराधे यांच्या आत्महत्येची सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इंस्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून अल्पावधीतच...

फायटर स्पोर्ट्स क्लब नंदेश्वर यांच्या वतीने PSI रकमाजी पडवळे यांचा सत्कार संपन्न

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या शिरणांदगी येथील रकमाजी जकु पडवळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक विभागीय...

मंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सत्कार

नंदेश्वर / प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी मंगळवेढा भाजप युवा मोर्चाकडून उत्साहपूर्ण तयारी करण्यात आली. मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथ...

सलग दुसऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत सासणे याने मिळविले उत्तुंग यश, सर्व स्तरातून अभिनंदन व...

नंदेश्वर / प्रतिनिधी : एन.एम.एम.एस. या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग असे यश मिळवित शिष्यवृत्तीस पात्र ठरल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या उच्च...

error: Content is protected !!