Homeताज्या बातम्यामराठी पत्रकार संघाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी प्रमोद बिनवडे तर शहराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची...

मराठी पत्रकार संघाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी प्रमोद बिनवडे तर शहराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड

मंगळवेढा / प्रतिनिधी
“सेवा,सुरक्षा अन् कर्तव्याशी एकसंघ” हे ब्रीद घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारांच्या कल्याणासाठी झटणारी संघटना म्हणून काम करत असलेल्या मराठी पत्रकार संघाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी साप्ताहिक रणयुग टाइम्सचे संपादक प्रमोद बिनवडे तर शहराध्यक्षपदी साप्ताहिक मंगळवेढा दिशाचे संपादक महादेव धोत्रे यांची निवड करण्यात आली.

सोलापूर येथील सुंदर मल्टिपर्पज हाॅल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बिनवडे व धोत्रे यांना मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.हि निवड एका वर्षासाठी करण्यात आली असून यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष किरण जोशी म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कल्याणकारी योजना आणि सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी ही मराठी पत्रकार संघटना प्रामुख्याने काम करत असून राज्यातील पत्रकारांची सेवा व सुरक्षा यांच्याशी कायम बांधील राहिलेली ही संघटना असून येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या वतीने सर्व स्तरातील पत्रकारांसाठी विविध उपक्रम व योजना राबवून पत्रकारांच्या कल्याणासाठी शासनाच्या वतीने आपण प्रयत्न करणार असल्याचेही जोशी यांनी सांगितले.

यावेळी दैनिक पुण्यनगरीचे व्यवस्थापकीय संपादक व्यंकटेश पटवारी,प्रदेश सचिव हरिभाऊ प्रक्षाळे, खजिनदार विवेक इनामदार,पंढरपूर तालुकाध्यक्ष मिलिंद यादव, सांगोला तालुकाध्यक्ष किशोर म्हमाणे, मोहोळ तालुकाध्यक्ष किशोर मारकड,बालाजी शेळके,पंढरपूर शहराध्यक्ष दिनेश खंडेलवाल,पंढरपूर शहर सहध्यक्ष विनोद पोतदार,दैनिक पुण्यनगरीचे कृष्णकांत चव्हाण,एनडी टीव्हीचे सौरभ वाघमारे, सदस्य संकेत किल्लेदार यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!