Homeताज्या बातम्याअश्रू अनावर,हृदयस्पर्शी व्याख्यान, नंदेश्वर येथे श्री मलुआई देवी यात्रेनिमित्त वसंत हंकारे यांनी...

अश्रू अनावर,हृदयस्पर्शी व्याख्यान, नंदेश्वर येथे श्री मलुआई देवी यात्रेनिमित्त वसंत हंकारे यांनी व्याख्यानात मानवी जीवनात आई-वडिलांचे महत्त्व दिले पटवून..

नंदेश्वर /प्रतिनिधी
प्रत्यक्षात परमेश्वर कोणीच पाहिला नाही पण मुलांच्या जडणघडणीसाठी, भविष्यासाठी रात्रीचा दिवस करून जे झटतात ते आई-वडीलच खरे आपले देव आहेत. त्यामुळे जिवंतपणे साक्षात परमेश्वराची भेट घेण्यासाठी इतरत्र न फिरता आपल्या आई-वडिलांमध्ये ज्यांनी देव शोधला तेच खरे जन्माने माणूस म्हणून शोभले असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले.

नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथे श्री मलुआई देवी यात्रेनिमित्त वसंत हंकारे यांचे व्याख्यान संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांचे हस्ते शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख महेश साठे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, माजी सभापती प्रदीप खांडेकर,माजी जि.प.सदस्य नामदेव जानकर, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे, मनसेचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, श्री बाळकृष्ण विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य विठ्ठल एकमल्ली, माऊली सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक समितीचे माजी सदस्य आकाश डांगे,दादासाहेब पवार, पांडुरंग चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी बोलताना हंकारे म्हणाले की, आज कॉलेज तरुण तरुणींच्यामध्ये दुर्दैवाने प्रेम प्रकरणांची संख्या वाढताना दिसत आहे. आणि हे युवक-युवती इतक्यावरच न थांबता सैराट होताना दिसत आहेत. यामुळे ज्यांनी वयाची वीस पंचवीस वर्षे आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले त्या आई-वडिलांना मात्र पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागत आहेत. यासारखे मोठे दुर्दैव आई-वडिलांच्या नशिबी दुसरे कोणतेच नाही.आई-वडिलांना जिवंतपणी या नरक यातना न देता मुलांनी त्यांच्या विचार करून यापासून लांब राहणे गरजेचे आहे.

यावेळी बोलताना अशोक चौंडे म्हणाले की, नंदेश्वर गावात आम्ही श्री मलुआई देवीची यात्रा गेल्या बारा वर्षापासून सातत्याने अत्यंत चांगले कार्यक्रम राबवित करीत आहोत. गेल्या दोन वर्षापासून मात्र आम्ही एक रुपयांचीही कोणाकडून वर्गणी न घेता कार्यक्रम राबवत आहोत. यापुढेही दर्जेदार आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रम करत राहणार आहोत.

यावेळी धनश्री मल्टीस्टेटचे संचालक रामचंद्र बंडगर, पोलीस पाटील संजय गरंडे,माजी उपसरपंच राहुल कसबे, आप्पासाहेब मेटकरी, श्री माऊली पतसंस्थेचे चेअरमन आण्णासाहेब बंडगर, नानासाहेब बंडगर, पोपट बंडगर, आबासाहेब पाटील, मुकुंद व्हरगळ हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे यांनी केले. सूत्रसंचालन औदुंबर कुंभार यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन नवनाथ मेटकरी यांनी केले.

उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर
वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण विद्यालयात संपन्न झाला. बाळकृष्ण विद्यालयातील विद्यार्थी व तसेच गावातील मान्यवर महिला पुरुषांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. मानवी जीवनात आई-वडिलांचे महत्त्व या नाजूक विषयावर वसंत हंकारे यांनी केलेल्या हृदयस्पर्शी व्याख्यानाने उपस्थित असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना व तसेच पालक मान्यवर या सर्वांनाच अश्रू अनावर झाल्याचे दिसले. व्याख्यानाच्या शेवटी उपस्थित असलेल्या पालकांना त्यांच्या मुलांनी मारलेल्या मिठीचा क्षण मात्र भाव खाऊन गेला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कौतुकास्पद…प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने मसनेरवस्ती शाळेत स्पोर्ट्स किटचे वाटप, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून...

नंदेश्वर / प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसनेरवस्ती येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. प्रेरणा स्पोर्ट गारमेंटचे...

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

error: Content is protected !!