Homeताज्या बातम्यामंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सत्कार

मंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सत्कार

नंदेश्वर / प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी मंगळवेढा भाजप युवा मोर्चाकडून उत्साहपूर्ण तयारी करण्यात आली. मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथ आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आकाश डांगे यांनी पंढरपूर येथे जाऊन कृष्णराज महाडिक यांचे स्वागत केले. त्यानंतर सोलापूर येथेही महाडिक यांच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली होती.

मंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाची संघटनात्मक कार्यकारणी लवकरच जाहीर होणार – आकाश डांगे
या भेटीदरम्यान मंगळवेढा भाजप युवा मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. आगामी काळात युवा मोर्चाची ताकद अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने मंगळवेढा तालुका कार्यकारिणीची नावे निश्चित करण्यात आली. ही नावे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली असून ती अधिकृत मान्यतेसाठी कृष्णराज महाडिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती आकाश डांगे यांनी यावेळी दिली.

यावेळी तालुकाध्यक्ष आकाश डांगे यांनी मंगळवेढा तालुक्यात भाजप युवा मोर्चामार्फत सुरू असलेल्या विविध संघटनात्मक कार्याची माहिती प्रदेशाध्यक्ष महाडिक यांना दिली. युवकांमध्ये पक्षाची विचारधारा पोहोचविणे, गावपातळीवर युवा कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणे, तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकट करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती त्यांनी मांडली.

कृष्णराज महाडिक यांची कौतुकाची थाप
कृष्णराज महाडिक यांनीही मंगळवेढा तालुक्यातील युवा मोर्चाच्या कार्याचे कौतुक करत आगामी काळात युवकांनी अधिक जोमाने पक्ष संघटन वाढीसाठी काम करावे, असे आवाहन केले. लवकरच भाजप युवा मोर्चा मंगळवेढा तालुका कार्यकारिणी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!