Homeताज्या बातम्याफायटर स्पोर्ट्स क्लब नंदेश्वर यांच्या वतीने PSI रकमाजी पडवळे यांचा सत्कार संपन्न

फायटर स्पोर्ट्स क्लब नंदेश्वर यांच्या वतीने PSI रकमाजी पडवळे यांचा सत्कार संपन्न

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या शिरणांदगी येथील रकमाजी जकु पडवळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेत (PSI) निवड झाल्याबद्दल फायटर स्पोर्ट्स क्लब नंदेश्वर यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

रकमाजी पडवळे यांनी पोलीस दलातील कर्तव्य सांभाळत सातत्यपूर्ण अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. सन 2016 मध्ये ते मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. तब्बल 9 वर्षांची सेवा बजावत असताना त्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पद मिळविले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून युवकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली आहे.

सदर PSI विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची पूर्व परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये, मुख्य परीक्षा डिसेंबर 2024 मध्ये तर मैदानी परीक्षा एप्रिल 2026 मध्ये पार पडली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल 20 मे 2026 रोजी जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये रकमाजी पडवळे यांनी यश संपादन केले. यावेळी आयोजित सत्कार समारंभात फायटर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष प्रा. गणेश जोरवर-पाटील यांनी रकमाजी पडवळे यांच्या मेहनतीचे कौतुक करत युवकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनीही त्यांच्या जिद्दीचे आणि कर्तव्यनिष्ठेचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमास लक्ष्मण बंडगर, माजी ग्रामपंचायत सदस्य भारत कळकुंबे, काशलिंग गरंडे, विराज जोरवर, सागर करे, अनिकेत लाड, दादा जोरवर, रोहित पवार, तन्वीर आत्तार, जनार्धन सलगर, शैलेश कळसे, शशांक दोलतडे, सुदर्शन बंडगर, यश कळसे, दत्ता माळी, शाम लोहार, रोहित गरंडे, बिरूदेव बंडगर, दया खांडेकर, योगेश बंडगर, अमोल कांबळे तसेच परिसरातील मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचा शेवट उपस्थितांच्या शुभेच्छा व अभिनंदनपर संदेशांनी उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!