Homeताज्या बातम्यानंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; इच्छुकांमध्ये उत्सुकता, काहींमध्ये नाराजी

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; इच्छुकांमध्ये उत्सुकता, काहींमध्ये नाराजी

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्य पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, चक्रानुक्रमानुसार जाहीर झालेल्या आरक्षणामुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकूण पाच प्रभागांतील १३ जागांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने काही इच्छुकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, काहींमध्ये नाराजीची भावना दिसून येत आहे. त्यामुळे गावात “कुछ खुशी, कुछ गम” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अनेकांची गणिते बिघडल्याचे चित्र
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी मागील काही महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. याआधी झालेल्या निवडणुकांतील आरक्षणाचा विचार करून अनेकांनी आपापल्या प्रभागात जनसंपर्क वाढवून निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन केले होते. मात्र नव्याने जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेकांची गणिते बिघडली असून काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार प्रभाग क्रमांक १ मध्ये एकूण तीन जागा असून त्यामध्ये अनुसूचित जाती-जमाती महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये तीन जागांसाठी ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण निश्चित झाले आहे.प्रभाग क्रमांक ४ मध्ये दोन जागांसाठी सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असे आरक्षण आहे. तर प्रभाग क्रमांक ५ मध्ये ओबीसी महिला आणि सर्वसाधारण अशा दोन जागांसाठी आरक्षण लागू झाले आहे.

प्रभाग क्रमांक एक आणि पाचमध्ये जातीय समीकरणे आणि आरक्षणात फरक
यंदाच्या आरक्षण प्रक्रियेत प्रभाग क्रमांक १ मध्ये इतिहासात प्रथमच अनुसूचित जाती-जमातीसाठी एक जागा आरक्षित झाली आहे. विशेष म्हणजे या प्रभागात अनुसूचित जाती-जमातीचे मतदार अत्यल्प असल्याने या आरक्षणाबाबत गावात चर्चा रंगू लागली आहे. दुसरीकडे प्रभाग क्रमांक ५ मध्ये अनुसूचित जाती-जमाती समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणावर असतानाही त्या ठिकाणी या प्रवर्गासाठी आरक्षण न पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या आरक्षणामुळे अनेक संभाव्य उमेदवारांचे राजकीय समीकरण बदलले असून, काहींना नव्याने राजकीय संधी उपलब्ध झाली आहे. गावातील राजकीय हालचालींना वेग आला असून विविध गटांनी आपल्या उमेदवारांच्या निवडीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

पहिल्यांदाच जनतेतून सरपंच निवड
दरम्यान, नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा प्रथमच सरपंच पदाची थेट निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीकडे गावकऱ्यांचे विशेष लक्ष लागले आहे. सरपंच पदासाठी कोण उमेदवारी करणार आणि गावातील प्रमुख राजकीय गटांची रणनीती काय असेल, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आगामी काळात उमेदवारी अर्ज, प्रचाराची रणधुमाळी आणि गावातील राजकीय घडामोडी यामुळे नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणूक अधिकच रंगतदार होणार, हे निश्चित मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!